निफाडला शेतकºयांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:12 AM2018-06-06T00:12:48+5:302018-06-06T00:12:48+5:30
निफाड : शेतकरी संपाच्या पाशर््वभूमीवर निफाड येथे शुक्र वारी (दि ८ ) भरणाºया आठवडे बाजारात शेतकºयांनी शेतमाल विक्र ीस आणू नये असे आवाहन निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे यांनी मंगळवारी शेतकºयांच्या बैठकीत केले.
निफाड : शेतकरी संपाच्या पाशर््वभूमीवर निफाड येथे शुक्र वारी (दि ८ ) भरणाºया आठवडे बाजारात शेतकºयांनी शेतमाल विक्र ीस आणू नये असे आवाहन निफाडचे नगरसेवक अनिल कुंदे यांनी मंगळवारी शेतकºयांच्या बैठकीत केले.
शेतकरी संपाच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्यासाठी शहरातील शेतकºयांची बैठक निफाड विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी संपाच्या आंदोलनात सहभागी होऊन त्या दृष्टीने शुक्र वारी आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले.
याप्रसंगी अनिल कुंदे , शिवाजी ढेपले यांची भाषणे झाली शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्याकडून राजीनामा मागणे या इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रसंगी माजी सभापती वाल्मिक कापसे, शिवाजी ढेपले, किसन कुंदे, उत्तम गाजरे, सुरेश कापसे, राजेंद्र बोरगुडे ,कृष्णा नागरे देवदत्त कापसे, दिलीप कापसे, जानकीराम धारराव ,संपत व्यवहारे, रमेश जाधव, सदाशिव धारराव, विजय रंधवे, ईश्वर धारराव ,गौतम कुंदे, धनंजय कुंदे, सुभाष गाजरे, स्वराज कुंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.शेतकरी उलटे टांगून घेणार
आंदोलनात निफाड येथील तहसील कचेरी व प्रांत कचेरीसमोर शेतकरी बैलगाडी आंदोलन करतील तसेच शेतकरी उलटे टांगून घेतील . शुक्र वारी निफाडचा आठवडे बाजार असून परिसरातील शेतकºयांनी बाजारात शेतमाल विक्र ीला आणू नये तसेच निफाडमधील व आठवडे बाजारासाठी येणाºया व्यापारीवर्गाने या आठवडे बाजारात व्यापार बंद ठेवून शेतकरी आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन अनिल कुंदे यांनी केले.