मुख्यमंत्र्यांच्या दौºयानिमित्त बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:57 AM2018-02-28T01:57:59+5:302018-02-28T01:57:59+5:30
वणी : सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी गडावर भेट देऊन संबंधितांना विविध सूचना दिल्या.
वणी : सप्तशृंगगडावरील फ्यूनिक्युलर ट्रॉलीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी गडावर भेट देऊन संबंधितांना विविध सूचना दिल्या. वणी ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिटच्या इमारतीचीदेखील पाहणी त्यांनी केली. गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यापूर्वी गडावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन व पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. गडावर स्वच्छतेला अग्रक्रम देऊन भाविकांच्या सोयीसाठी फ्यूनिक्युलर ट्रॉली लवकरात लवकर सुरू करण्यासाठी योग्य ती पावले उचलून भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. गडावरील समस्या मांडण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. माजी सरपंच संदीप बेनके यांनी मार्कंडेयपर्वत ते सप्तशृंगगड असा रोप-वे करावा अशी मागणी केली. प्लॅस्टिकबंदी, स्वच्छता, आरोग्य याबाबींवर चर्चा करण्यात आली. न्यासाचे रावसाहेब शिंदे, राजेश गवळी, ईश्वर कदम, प्रकाश कडवे, मोहसीन पठाण, दीपक दूरवर, विनायक दुबे, योगेश कदम व विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी वणी रुग्णालयास भेट देऊन कामाबाबत माहिती घेतली.