काळुस्ते येथील शाळेला नवी दिल्लीच्या अधिकाºयांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:38 AM2017-09-04T00:38:00+5:302017-09-04T00:38:14+5:30
इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, काळुस्ते या शाळेला डिजिटल इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत नवी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने भेट देऊन पाहणी केली. दुर्गम भागातील या शाळेने डिजिटल साक्षरतेत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, काळुस्ते या शाळेला डिजिटल इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत नवी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकारी पथकाने भेट देऊन पाहणी केली. दुर्गम भागातील या शाळेने डिजिटल साक्षरतेत केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांतील आयटीसी लॅबची पाहणी करणाºया नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाºयांनी लोकनेते गोपाळराव गुळवे प्रणित महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, काळुस्ते या शाळेला भेट देऊन पाहणी केली. येथील विद्यार्थी व शिक्षकांसमवेत विविध विषयांवर चर्चा केली. विद्यार्थी व पालकांना डिजिटल साक्षरता अभियानासंबंधी माहिती दिली. यावेळी नवी दिल्लीच्या अधिकारी पथकातील मनस्विनी बारल, अंकुर शर्मा, रोहित पटेल, हसी वेंकटेशन, सी.एन. बोस, संजय मोंडाळ, कमल शर्मा, विजय सोळंकी, रेश्मा आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक देवेंद्र ठाकरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. एस.डी. तांदळे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.