कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 03:39 PM2020-10-22T15:39:29+5:302020-10-22T15:41:02+5:30
सिन्नर: तालुक्यातील खडांगळी येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नुकताच संवाद मेळावा संपन्न झाला.
सिन्नर: तालुक्यातील खडांगळी येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नुकताच संवाद मेळावा संपन्न झाला.
भारत दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर माजी उपसरपंच केशव कोकाटे. युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक खुळे, रंगनाथ कोकाटे, सुनील ठोक आदी उपस्थित होते.
भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांना कांदा बियाणे टाकण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत येत असलेल्या समस्या व त्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास समजावून सांगितला. ज्या शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करायची असेल त्यांनी आता यापुढे कांदा बियाणे सुद्धा स्वतःच्या घरी तयार केले पाहिजे कारण अनेक शेतकऱ्यांची बियाणामध्ये फसवणूक झाली असून अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदी केली. रोप तयार करण्यापासून ते विक्री पर्यंत कांद्याला साधारण वीस रुपये प्रतिकिलो मागे खर्च येत असतो. परंतु कांद्याला हवे तसे बाजारभाव मिळत नाही. याविरुद्ध सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांदा दर वाढीकरता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या पाठीशी एकजुटीने उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत कोणीही कांदा उत्पादक शेतकऱ्याची दखल घेतली नाही. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणे करता संघटना एकजुटीने लढा देईल असे आश्वासन दिघोळे यांनी उपस्थितांना दिले.
मेळाव्यात सुनील बारकू ठोक यांची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानिमित्त दिघोळे यांच्या हस्ते ठोक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कैलास ठोक, राजेंद्र कोकाटे, गिरीश ठोक, गोरख कोकाटे, रवी ठोक, लक्ष्मण कोकाटे, बाबुराव ठोक, गोपाळ ठोक, किरण ठोक, गणेश कोकाटे, दीपक खुळे, गणेश ठोक, योगेश ठोक, सोमनाथ कोकाटे, किशोर ठोक, उमेश खुळे, सुरेश खुळे, संजय खुळे, कृष्णा खुळे, केशव भोकनळ, ज्ञानेश्वर भोकनळ व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
कांद्याचे शास्त्र समजून घ्यावे
कांदा पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे व त्याची गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे.कांदा चाळीत जास्तीत जास्त टिकेल यासाठी त्याच्या साठवणुकीचे तंत्र शिकून शेतकऱ्यांनी कांद्याचे व्यवस्थापन करावे.
-अशोक खुळे, तालुका अध्यक्ष कांदा उत्पादक युवा संघटना
कांदा उत्पादक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने सुनील ठोक यांचा सत्कार करताना भारत दिघोळे. समवेत रंगनाथ कोकाटे व अशोक खुळे.