पाटोदा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:14 PM2020-01-11T23:14:29+5:302020-01-12T01:23:31+5:30

येवला तालुक्यातील पाटोदा येथील जनता विद्यालयाच्या १९८६ बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. यावेळी बालमित्रांनी एकमेकांच्या सुख-दु:खांची विचारपूस करत आठवणींना उजाळा दिला. प्रमुख पाहुणे म्हणून शबाना शेख व शेख रशीद बाबुभाई, लता पाटील, मेजर पाटील, पुष्पा व प्रकाश वावधाने उपस्थित होते.

Meeting of Patoda School alumni | पाटोदा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

पाटोदा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

googlenewsNext

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा येथील जनता विद्यालयाच्या १९८६ बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. यावेळी बालमित्रांनी एकमेकांच्या सुख-दु:खांची विचारपूस करत आठवणींना उजाळा दिला. प्रमुख पाहुणे म्हणून शबाना शेख व शेख रशीद बाबुभाई, लता पाटील, मेजर पाटील, पुष्पा व प्रकाश वावधाने उपस्थित होते.
मेळाव्यात प्रारंभी सरस्वती प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर डॉ. राजेश साळुंखे व चाणक्य कलापथकासह शाहीर संजय आव्हाड, राजेश साळुंखे यांनी प्रबोधन केले. शिक्षणानंतर कामाधंद्यानिमित्त दुरावलेले स्नेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले. शबाना शेख, प्रतिभा जाधव, पुष्पा वरे, लता पाटील, राजेश साळुंखे, कांतीलाल क्षीसागर, बाळकृष्ण राजगुरु, शांताराम दुनबळे, साईनाथ कदम, सतीश गंवादे, बाळासाहेब शेटे यांच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. एजाज देशमुख, डॉ. राजेश साळुंखे, साईनाथ कदम यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा आहेर, श्रीकांत संधान यांनी आभार मानले. याप्रसंगी बाळासाहेब पिंपरकर, गणेश पाटील, प्रकाश ढोपरे, साहेबराव दौंडे, दत्ता लाडंबिले, रवंींद्र राजगुरु , रमतुल्ला चौधरी, खडेराव जगताप, राजाराम कदम, किसन कदम, पोपट जाधव, निवृत्ती ठोंबरे, साहेबराव कांदळकर, गोरख तनपुरे, नानासाहेब आभाडे, भाऊसाहेब बढे, मधुकर पवार, विक्र म भुसारे,
दुल्हेमिया मुलांनी, अण्णा दौंडे, काका सोनवणे, उदय शिंदे, रामभाऊ नाईकवाडे, शरद झाल्टे, पोपट जाधव, विश्वास सोनवणे, केदू पगारे आदी उपस्थित होते.पाटोदा येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थी.

 

Web Title: Meeting of Patoda School alumni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.