पोलीस प्रशासनासाठी संमेलनस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:57+5:302021-02-07T04:14:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमस्थळी पोलीस विभाग व ...

Meeting place for police administration | पोलीस प्रशासनासाठी संमेलनस्थळी

पोलीस प्रशासनासाठी संमेलनस्थळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमस्थळी पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन अधिकारी असलेल्या स्वतंत्र कंट्रोल रूमची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना पालकमंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी आयोजकांना केली. साहित्य संमेलनाच्या जागेच्या नियोजनाबाबत आज भुजबळ फार्म येथे बैठक पार पडली. यावेळी सादरीकरणातून संपूर्ण नियोजनाबाबत भुजबळ यांनी आढावा घेतला.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, विनायक रानडे, सुभाष पाटील यांच्यासह आयडिया कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ यांनी बैठकीदरम्यान साहित्य संमेलनाच्या ठिकाणी असलेले मुख्य स्टेज, कवी कट्टा, बालसाहित्य कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, माध्यम प्रतिनिधींची व्यवस्था, पार्किंग, जेवणाची व्यवस्था, बुक स्टॉल, पुस्तक प्रकाशन सोहळा स्टेज, भोजनाची व्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन यासह संपूर्ण नियोजनाचा सूक्ष्म आढावा घेतला. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमलेनासाठी सर्व कार्यक्रमांचे सूक्ष्म स्वरुपात नियोजन करण्यात यावे. त्यात कुठलीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. तसेच संमेलनस्थळी येणाऱ्या अडचणी, तक्रारी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र कंट्रोल रूमची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार या कंट्रोल रूमच्या माध्यमातून सर्व अडचणी सोडविल्या जातील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

Web Title: Meeting place for police administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.