‘पवित्र’विरोधात आज पुण्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 02:11 AM2018-07-07T02:11:49+5:302018-07-07T02:12:09+5:30

नाशिक : खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षणसेवक भरतीसाठी वापरात येणाऱ्या ‘पवित्र’ संगणकीय प्रणालीविरोधात राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी पुणे येथील बालेवाडीतील अशोक बालवडकर यांच्या शिक्षण संस्थेत शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजता राज्यव्यापी बैठक बोलावली आहे.

Meeting in Pune today against 'holy' | ‘पवित्र’विरोधात आज पुण्यात बैठक

‘पवित्र’विरोधात आज पुण्यात बैठक

Next

नाशिक : खासगी शाळांतील शिक्षक, शिक्षणसेवक भरतीसाठी वापरात येणाऱ्या ‘पवित्र’ संगणकीय प्रणालीविरोधात राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी पुणे येथील बालेवाडीतील अशोक बालवडकर यांच्या शिक्षण संस्थेत शनिवारी (दि.७) दुपारी २ वाजता राज्यव्यापी बैठक बोलावली आहे.
पुणे येथे होणाºया या बैठकीसाठी खासगी शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष विजय नवल पाटील, मविप्र शिक्षण संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, क्र ांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्यासह मराठवाडा, दक्षिण व उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख संस्थाचालक या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता असून, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संस्थाचालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट न झाल्याने संस्थाचालकांनी ही बैठक आयोजित केली आहे. शिक्षकभरतीविरोधात एल्गार पुकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, १२ जुलैला शिक्षण संस्थाचालकांना याप्रणालीविरोधात आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यामुळे याविषयीही शनिवारच्या राज्यस्तरीय बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Meeting in Pune today against 'holy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.