मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:18 PM2018-12-07T23:18:48+5:302018-12-08T00:14:38+5:30
मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांचे पाण्याचे आरक्षण, बंधारे, दळणवळणासाठी पूल व रस्त्यांची कामे तसेच येथील नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिक : मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिकांचे पाण्याचे आरक्षण, बंधारे, दळणवळणासाठी पूल व रस्त्यांची कामे तसेच येथील नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मांजरपाडा योजनेतील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. अलीकडेच छगन भुजबळ यांनी अधिकाºयांसमवेत मांजरपाडा प्रकल्पाची पाहणी केली होती. यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी त्यांची भेट घेऊन येथील नागरिकांचे विविध प्रश्न त्यांच्याकडे मांडले होते. त्यानुसार भुजबळ यांनी लगेचच अधिकाºयांची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्त नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.
यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनीदेखील स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांकडे अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे सांगितले.
तसेच प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या जमिनींचे सपाटीकरण व इतर प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या.
बैठकीस लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक
अभियंता अलका वाघ, मांजरपाडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता
गिरीश संघांनी, सहायक
अभियंता विश्वास दराडे यांच्यासह स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मांजरपाडा प्रकल्पाजवळील स्थानिक नागरिकांना स्थानिक वापरासाठी पाण्याचे आरक्षण, गावांना जोडणारे पूल, बंधारे, रस्त्यांचे कामे तातडीने मार्गी लावण्यात यावे. प्रकल्प सुरूझाल्यापासून या प्रकल्पाच्या माध्यमातून जमा झालेल्या गौणखजिनाच्या रकमा स्थानिक देवसाने, करंजखेड, चौसाळे इत्यादी ग्रामपंचायतींना ग्रामनिधी म्हणून देण्यात याव्या व त्याचा प्रस्ताव तत्काळ महसूल विभागाला पाठविण्यात यावा.
- छगन भुजबळ, आमदार