समको बँकेची सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:33+5:302021-03-31T04:14:33+5:30
शनिवारी (दि.२८) संस्थेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाइन वार्षिक सभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने सभासदांनी सहभाग नोंदविला. दीपप्रज्वलन व ...
शनिवारी (दि.२८) संस्थेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाइन वार्षिक सभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने सभासदांनी सहभाग नोंदविला. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर सभेस प्रारंभ करण्यात आला. यानंतर वर्षभरात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर विषयानुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांनी मागील इतिवृत्त वाचन केले. या इतिवृत्तास उपस्थित ऑनलाइन सभासदांनी आवाजी मतदानाने एकमुखाने मंजुरी दिली. यानंतर सर्व विषयांवर सखोल चर्चा होऊन सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी बँकेच्या पोटनियम दुरुस्तीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार १०० कोटी ठेवीनंतर बोर्ड ऑफ मॅनेजमेंट नियम मंजुरी देण्यात आली. तसेच शंभर कोटी ठेवी ओलांडलेल्या संचालक मंडळाच्या संख्येत वाढ करण्याच्या पोटनियमास मंजुरी देण्यात आली. बँकेचे सभासद अशोक गुळेचा यांनी आयत्यावेळी विषयात सभासदांसाठी विमा योजना राबविण्याची मागणी केली. राजकुमार सोनी यांनी सभासद खातेदारांना कोविडमुळे व्याजदारात सवलत देण्याची मागणी केली. बँकेचे ज्येष्ठ संचालक सुमतीलाल बुरड यांनी कॅनडा येथून सभेस उपस्थित राहून नेट बँकिंग सुरू करण्याबाबत सूचना केली. किशोर कदम यांनी न्यायप्रविष्ट विषयांवर सभासदांनी न्यायालयात जावे, सभासदांना वेठीस धरू नये, असे आवाहन केले.
यावेळी किशोर कदम, नगरसेवक काकाजी सोनवणे, महेश देवरे, अरविंद सोनवणे, महेंद्र शर्मा, रमेश देसले, सुरेश बागड, धनाकांत येवला, रूपाली पंडित, कल्पना साळवे, दिलीप मेतकर, श्रीधर कोठावदे, अशोक निकम, डॉ. विठ्ठल येवलकर, ज्योती कोठावदे, कमलकिशोर भांगडिया, किरण मोरे, रूपाली जाधव, डॉ. निनाद येवलकर, पल्लवी कोठावदे आदींसह सभासद सहभागी झाले होते. ऑनलाइन सभेस संचालिका रूपाली कोठावदे, जयवंत येवला, दिलीप चव्हाण, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, प्रवीण बागड, शरद सोनवणे, प्रकाश सोनग्रा, तुषार खैरणार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक दिलीप चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन व्हा.चेअरमन कल्पना येवला यांनी केले.