चांदोरीत शिवसैनिकांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:04 AM2021-07-13T04:04:30+5:302021-07-13T04:04:30+5:30
शिवसेना ही लढावू संघटना आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ही मोहीम राबवून ...
शिवसेना ही लढावू संघटना आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ही मोहीम राबवून शिवसंपर्क अभियान यशस्वी करावे, असे आवाहन कदम यांनी केले. येत्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्यासाठी शिवसेनेने १२ ते २४ जुलैदरम्यान शिवसंपर्क मोहीम हाती घेतली आहे. या शिवसंपर्क पंधरवड्यात आरोग्य शिबिर, वृक्षारोपण,रक्तदान शिबिर, आशा सेविकांसह कोविडयोद्ध्यांचा सत्कार तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सभापती सुलभा पवार, दिलीप मोरे, अनिल कुंदे, उपजिल्हाप्रमुख नीलेश पाटील, गोकुळ गीते, तालुकाप्रमुख सुधीर कराड, देवदत्त कापसे, शरद कुटे, अशपाक शेख, केशव बोरस्ते, डॉ. प्रल्हाद डेर्ले, पंडित आहेर आदी उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवराय व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुधीर कराड व खंडू बोडके-पाटील यांनी शिवसंपर्क अभियानाची संकल्पना विशद केली. यावेळी क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच अशपाक शेख, अनिल कुंदे, शरद खालकर, जावेद शेख, नाना तिडके यांनी शिवसैनिकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास आबा गडाख, दत्तू भुसारे, विजय गवळी, सरपंच अमोल जाधव, भगवान चव्हाण, आरिफ इनामदार, मोहन जगताप, किरण शिंदे, बाळासाहेब पावशे, रावसाहेब गोहाड आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. आभार उत्तम गडाख यांनी मानले.
फोटो : १२ चांदोरी शिवसंपर्क
चांदोरी येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्याप्रसंगी बोलताना अनिल कदम. समवेत बाळासाहेब क्षीरसागर, सुलभा पवार व पदाधिकारी.
120721\12nsk_4_12072021_13.jpg
चांदोरी येथे शिवसंपर्क अभियान मेळाव्याप्रसंगी बोलताना अनिल कदम. समवेत बाळासाहेब क्षीरसागर, सुलभा पवार व पदाधिकारी.