सिन्नर पंचायत समितीची सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 06:21 PM2018-10-12T18:21:16+5:302018-10-12T18:23:16+5:30

सिन्नर पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता, बाह्य विभाग आणि पंचायत समितीच्या विविध विभागांतील महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभा तहकूब करण्याची वेळ आली.

Meeting of the Sinnar Panchayat Samiti | सिन्नर पंचायत समितीची सभा तहकूब

सिन्नर पंचायत समितीची सभा तहकूब

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या अनुपस्थिती :  मासिक आढावा बैठक

सिन्नर : येथील पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता, बाह्य विभाग आणि पंचायत समितीच्या विविध विभागांतील महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभा तहकूब करण्याची वेळ आली.
पंचायत समितीची मासिक सभा तहकूब झाल्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी आरोपाच्या फैरी झाडत सत्ताधाºयांच्या एकाधिकार शाहीचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाºयांचा अधिकाºयांवर वचक राहिला नसून, बैठक असूनही ते अनुपिस्थत आहेत, असा आरोप भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, योगीता कांदळर, तातू जगताप यांनी केला आहे.
सिन्नर पंचायत समितीची मासिक आढावा बैठक गुरुवारी पंचायत समितीच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार विरोधी भाजपाचे सर्व सदस्य सभागृहात हजर झाले. मात्र निर्धारित वेळेनंतर सुमारे तासभर प्रतीक्षा केल्यानंतरदेखील सभापती,
सत्ताधारी गटाचे सदस्य आणि अधिकारी बैठकीला हजर झाले
नाही. तथापि, याच वेळी सभापतींच्या दालनात अधिकारी, सत्ताधारी
सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती यांची बैठक सुरू असल्याचा आरोप विरोधी भाजपाच्या सदस्यांनी केला. जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती सभापतींच्या दालनात आढावा बैठक घेत असल्याचा आरोपही भाजपाच्या पदाधिकाºयांनी केला.
२ वाजेच्या सुमारास भाजपाच्या सदस्यांनी गटविकास अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बैठकीबाबत विचारणा केल्यानंतर गटविकास अधिकारी सभागृहात हजर झाल्या. बैठक सुरू झाल्यानंतर आरोग्य, पाणीपुरवठा या खात्याचे महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने आढावा घ्यायचा तरी कसा, असा प्रश्न उपस्थित राहिल्यानंतर चर्चेअंती बैठक तहकूब करण्यात आली.
बैठकीस पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, भाजपाच्या पदाधिकाºयांसह शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे, विरोधी गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, तातू जगताप, संगीता पावसे, सुमन बर्डे, शोभा बर्के, योगीता कांदळकर, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदी उपस्थित होते.
आरोप फेटाळले
तालुक्यात विकासकामांचे भूमिपूजन झाल्यानंतर आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे सिन्नरला आले. त्यानंतर सर्वजण पंचायत समितीत आले. उदय सांगळे यांना चहापानासाठी आम्ही थांबवले असल्याचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांनी सांगितले. विरोधक बिनबुडाचे आरोप करत असून, केवळ विरोधासाठी विरोध एवढेच त्यांचे धोरण आहे. दुष्काळी स्थिती व साथरोगांच्या आरोग्य व पाणीपुरवठ्यावरच आढावा घेण्यात येणार होता. या विभागाचे अधिकारी नाशिकला बैठकीसाठी गेल्याने विरोधी सदस्यांशी चर्चा केल्यानंतर बैठक तहकूब केल्याचे उपसभापती भाबड यांनी सांगितले.

Web Title: Meeting of the Sinnar Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.