सिन्नर तालुका कॉँग्रेस कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:08 AM2018-09-30T00:08:35+5:302018-09-30T00:09:46+5:30
सिन्नर : केवळ आश्वासनांचा भडीमार करून सर्वसामान्यांना झुलवत ठेवणाऱ्या भाजपा-सेनेच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉँग्रेसने महाराष्टÑभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्याचा निर्धार तालुका कॉँग्रेस बैठकीत घेण्यात आला.
सिन्नर : केवळ आश्वासनांचा भडीमार करून सर्वसामान्यांना झुलवत ठेवणाऱ्या भाजपा-सेनेच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कॉँग्रेसने महाराष्टÑभर जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्याचा निर्धार तालुका कॉँग्रेस बैठकीत घेण्यात आला.
येथील शासकीय विश्रामगृहावर कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सिन्नर शहरात ८ आॅक्टोबर रोजी या जनसंघर्ष यात्रेचे आगमन होणार असून, यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, तसेच कॉँग्रेसचे राज्यातील आमदार आणि माजी मंत्री उपस्थित राहणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले.
भाजपाच्या विश्वासघातकी, जुलमी आणि भ्रष्ट राजकारणामुळे जनता त्रस्त झाली आहे. गत चार वर्षांत सरकारने गरीब, शेतकरी आणि कष्टकºयांना केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. यावेळी युवक कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश चोथवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीस कॉँग्रेसचे शहराध्यक्ष मुजाहीद खतीब, उदय जाधव, अश्फाक शेख, युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे, जाकीर शेख, संतोष जोशी, शिवराम शिंदे, बाळासाहेब गोर्डे, चंद्रकांत डावरे, नारायण भालेराव, मधुकर कपूर, गोपीनाथ झगडे, प्रभाकर शेलार, भास्कर खताळे, चंद्रकांत महाले, रमेश जाधव, जाकीर शेख, दिलीप बागुल, विजय कुवर, ज्ञानेश्वर लोखंडे, अशोक घरटे आदींसह कॉँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. विविध विषयांवर चर्चा राज्यात १५ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही सरकारच्या खिसेकापू धोरणामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, असा आरोप बैठकीत करण्यात आला. बैठकीत जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.