समाजकल्याण समितीची सभा केली तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:09 AM2018-10-06T00:09:33+5:302018-10-06T00:12:23+5:30
जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाच्या निधीचे नियोजन रखडल्याने संतप्त झालेल्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी विभागातील अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देऊनही शुक्रवारपर्यंत (दि. ५) नियोजन सादर न झाल्याने, सभापतींनी सभा न घेण्याचा पवित्रा घेतला. यातच अधिकाºयांनी दलित वस्ती योजनेतील निधीविषयी चुकीची माहिती दिली. त्यामुळे सभेला उपस्थित सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभापतींनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
नाशिक : जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाच्या निधीचे नियोजन रखडल्याने संतप्त झालेल्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी विभागातील अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देऊनही शुक्रवारपर्यंत (दि. ५) नियोजन सादर न झाल्याने, सभापतींनी सभा न घेण्याचा पवित्रा घेतला. यातच अधिकाºयांनी दलित वस्ती योजनेतील निधीविषयी चुकीची माहिती दिली. त्यामुळे सभेला उपस्थित सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सभापतींनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीला चारोस्कर यांनी अधिकाºयांना नियोजन सादर करण्यासोबतच लाभार्थींच्या याद्या सभेसमोर ठेवण्यास सांगितले; मात्र अधिकाºयांकडून कोणतेही नियोजन ठेवण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या चारोस्कर यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. वेळेत नियोजन होणार नसेल, तर सभा घेता कशाला, अशा परखड शब्दात त्यांनी अधिकाºयांना खडे बोल सुनावले. सभेला समितीचे सदस्य यशवंत शिरसाठ, ज्योती जाधव, शोभा कडाळे, सुरेश कमानकर, हिरामण खोसकर, रमेश बरफ, वनिता शिंदे, सुमन निकम, प्रभारी समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील उपस्थित होते.
अधिकाºयांची बैठक
तहकूब सभेनंतर सभापती चारोस्कर यांसह सदस्यांनी विभागातील अधिकाºयांची बैठक घेत नियोजनाचा आढावा घेतला. २४ तासांत नियोजन सादर करण्याचे आदेश सभापती चारोस्कर यांनी यावेळी अधिकाºयांना दिले.