त्र्यंबकला श्रीमहंत हरिगिरी यांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:28 PM2019-12-23T13:28:20+5:302019-12-23T13:28:30+5:30
त्र्यंबकेश्वर : उज्जैन व प्रयागराज कुंभमेळ्यात शासन व आखाडा परिषद यांच्यात समन्वय घडविणारे श्री पंच दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे संरक्षक महंत यांची पुनश्च अखिल भारतीय अखाडा परिषदेचे आंतर्राष्ट्रीय महामंत्री म्हणुन एकमताने निवड झाली आहे.
महामंत्रीपदी निवड : अखिल भारतीय आखाडा परिषद
त्र्यंबकेश्वर : उज्जैन व प्रयागराज कुंभमेळ्यात शासन व आखाडा परिषद यांच्यात समन्वय घडविणारे श्री पंच दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे संरक्षक महंत यांची पुनश्च अखिल भारतीय अखाडा परिषदेचे आंतर्राष्ट्रीय महामंत्री म्हणुन एकमताने निवड झाली आहे. या निवडीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांचे जल्लोषात व उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. गावातून त्यांची मिरवणूक देखील काढण्यात आली.
विशेष म्हणजे अखाड्याची स्वत:च्या मालकीची शेती असुन अखाड्याचे शेतमजुर व सेवेकरी यांना फळे मिठाईचे वाटप करण्यात आले. कुंभमेळ्यात महत्वाच्या अखाडा परिषद व शासकीय बैठका देखील खाड्याच्या पिंपळद (त्र्यंबक) येथील शेतीच्या फार्म हाऊसमध्येच पार पडल्या. महाराजांचा हृद्य सत्काराचा कार्यक्र माचे आयोजन येथेच करण्यात आला.सत्कार झाल्यानंतर महाराजांनी शेताच्या बांधावर बसुन ध्यानधारणा केली. यावेळी उपस्थितांना ते म्हणाले आपल्याला धान्य खनिज तेल आदी जे काही मिळते ते धरणी मातेच्या पोटातुनच मिळते. याकरिता धरणी मातेची सेवा केली पाहिजे.
याप्रसंगी त्यांच्या समवेत महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज, साध्वी शैलजा माता, पदमानंद सरस्वती सहजानंद गिरी,
विष्णुगिरी, अरु ण भरती , नीलकंठ गिरी, दुर्गागिरी हे सर्व ठाणापती
श्रीमहंत शिवानंदपुरी हरीषानंद गिरी आदींसह निलपर्वत अखाडा शिष्य परिवार गावातील परगावातील शिष्य परिवार उपस्थित होते.
-------------------------------
भारतातील श्रीपंच दशनाम जुना सर्व अखाड्यांचे संरक्षक श्रीमहंत हरीगिरी महाराज यांची अखिल भारतीय अखाडा परिषदेचे महामंत्री म्हणुन एकमताने निवड झाल्याबद्दल त्र्यंबकेश्वर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीप्रसंगी स्वामी शिवगिरी महाराज, साध्वी शैलजा माता, पदमानंद सरस्वती, सहजानंद गिरी, विष्णुगिरी आदी. (२३ टीबीके १)