कसबे वणी येथे ऊसलागवडीसाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:22+5:302021-08-26T04:17:22+5:30

कसबे वणी येथे ऊसलागवड व इथेनॉल प्रकल्पाच्या माहितीबाबत चेअरमन श्रीराम शेटे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी विलास कड ...

Meeting for sugarcane cultivation at Kasbe Wani | कसबे वणी येथे ऊसलागवडीसाठी बैठक

कसबे वणी येथे ऊसलागवडीसाठी बैठक

googlenewsNext

कसबे वणी येथे ऊसलागवड व इथेनॉल प्रकल्पाच्या माहितीबाबत चेअरमन श्रीराम शेटे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी विलास कड बोलत होते. साखर उद्योग मोठ्या अडचणीतून वाटचाल करत असल्याने राज्यातील अनेक साखर कारखाने एफआरपी देऊ शकले नसताना कादवाने पूर्ण एफआरपी अदा केली आहे. काळाची पावले ओळखत श्रीराम शेटे यांनी कादवाचे विस्तारीकरण करण्यासोबतच इथेनॉल प्रकल्प हाती घेतला असून, त्यास सभासद उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठेवी देत असल्याचेही कड यांनी सांगितले.

यावेळी चेअरमन श्रीराम शेटे यांनी कादवा कारखान्याची वाटचाल विशद केली. वेळेत ऊसतोड व्हावी याचे नियोजन केले जाईल, असे शेटे यांनी सांगितले. यावेळी संचालक मधुकर गटकळ, दिनकर जाधव, शिवाजी बस्ते, रघुनाथ जाधव यांच्यासह प्रकाश कड, जगदीश कड, महेंद्र बोरा, वाळू गोलांडे, सावळीराम शिरसाठ, जयवंत थोरात, उत्तम थोरात, राजेंद्र थोरात, नंदू महाले, सुनील महाले, लक्षण महाले, बाळासाहेब घडवजे, स्वप्नील देशमुख, चंद्रवदन देशमुख, राजेंद्र देशमुख, राजेंद्र देवरे, संजय वाघ, बाळासाहेब पूरकर, बाबूराव पाचपिंड, वामन पाचपिंड, अंकुश धुळे आदी सभासद ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Meeting for sugarcane cultivation at Kasbe Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.