आदिवासी विकास कार्यकारी संस्थांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 01:12 AM2020-07-20T01:12:33+5:302020-07-20T01:13:04+5:30
पेठ तालुका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कर्ज माफी व पिक कर्जवाटप करण्यासंदर्भात तालुक्यातील संस्था पदाधिकारी व जिल्हा बँक यांची संयुक्त बैठक झाली.
पेठ : तालुका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कर्ज माफी व पिक कर्जवाटप करण्यासंदर्भात तालुक्यातील संस्था पदाधिकारी व जिल्हा बँक यांची संयुक्त बैठक झाली.
येथील जिल्हा बँक सभागृहात संचालक नामदेव हलकंदर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पेठ तालुक्या १३ आदिवासी वि.का.सहकारी संस्था आहेत.सहकारी संस्थेच्या स्टेशनरी खर्च व सचिवांचे पगार हे आदिवासी विकास विभागाने अदा करावे अशी सूचना सचिवाच्या शिष्टमंडळाने मांडली. याप्रसंगी जि.प.सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख भास्कर गावित , सभापती पंचायत विलास आलबाड, तहसीलदार संदीप भोसले , पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे ,सहयक निबंधक विघ्ने,सहकार अधिकारी राजीव इपर, नगराध्यक्ष मनोज घोंगे,बॅक विभागीय अधिकारी मानभाव, पद्माकर कामडी,नगरसेवक संतोष डोंमे,बापु महमाने,पुंडलीक महाले,यांचे सह आदिवासी सहकारी संस्था चेअरमन,संचालक व सचिव उपस्थित होते. चेअरमन पदमाकर कामडी यांनी सुञसंचलन केले.