येवला वनविभागाने घडविली माय लेकरांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:20 PM2018-03-27T14:20:00+5:302018-03-27T14:20:00+5:30

निफाड -आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवन प्रवास आहे . आईचे वात्सल्य हे तिच्या लेकराचं जीवन असं व्यापून टाकते की त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. अशा मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते. त्या ताटातूट झालेल्या लेकरांना आई जेव्हा शोधून आपल्या कवेत घेते तेव्हा झालेली भेट भावभावनांचा कल्लोळ असतो. बिबट्याची मादी आणि तिच्या चार बछड्यांची झालेली भेट हा त्याचाच एक साक्षात्कार आहे.

The meeting was organized by Yeola Forest Department | येवला वनविभागाने घडविली माय लेकरांची भेट

येवला वनविभागाने घडविली माय लेकरांची भेट

Next

निफाड -आईचं आणि तिच्या लेकराचं नातं हा भावनिक जीवन प्रवास आहे . आईचे वात्सल्य हे तिच्या लेकराचं जीवन असं व्यापून टाकते की त्या लेकरांना ही आईची माया आजन्म मायेची ऊब देत असते. अशा मायलेकरांची ताटातूट ही आईसाठी हृदय पिळवटून टाकणारी असते. त्या ताटातूट झालेल्या लेकरांना आई जेव्हा शोधून आपल्या कवेत घेते तेव्हा झालेली भेट भावभावनांचा कल्लोळ असतो. बिबट्याची मादी आणि तिच्या चार बछड्यांची झालेली भेट हा त्याचाच एक साक्षात्कार आहे. अशीच मायलेकरांची भेट घडवून आणण्याचा निफाड तालुक्यातील तिसरा प्रयोग यशस्वी झाला आहे. येवला वनविभागाने निफाड तालुक्यातील नागापूर येथे शरद नाठे यांच्या शेतात ऊसतोड चालू असतांना ऊसतोड कामगारांना २४ मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास उसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते. नाठे यांनी ही घटना येवला वन विभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या पथकाने तात्काळ नाठे यांच्या शेतात धाव घेऊन हे चारही बछडे ताब्यात घेतले होते . यातील दोन बछडे नर तर दोन बछडे मादी आहेत. हे बछडे १५ दिवसाच्या आतील आहेत. त्यानंतर नाशिकचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव , नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक डॉ सिवाबाला यांच्या मार्गदर्शनाखाली येवला वन विभागाचे वनसंरक्षक राजेंद्र कापसे , वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम एम राठोड , वनरक्षक विजय टेकणर वनरक्षक भरत पाटील , भैय्या शेख आदींचे पथकाने नाठे यांच्या शेतात हे बछडे कॅरेटमध्ये ठेऊन ते बछडे त्यांच्या आईच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. २४ मार्च रोजी बछडे सापडले, त्याच दिवशी रात्री हे बछडे एका प्लास्टिक कॅरेटमध्ये ठेऊन त्यावर एक कॅरेट ठेवण्यात आले. या शेतात मादीला जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावण्यात आला होता. त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याची मादी या बछडे ठेवलेल्या कॅरेटजवळ आली. आपल्या तीन बछड्यांना तोंडात धरून एकेक करून ती घटनास्थळावरून घेऊन गेली. मात्र यातील चौथे बछडे तिथेच राहिले. त्यामुळे २५ रोजी वनविभागाने पुन्हा कॅरेटमध्ये राहिलेले चौथे बछडे ठेवले. दि २६ च्या पहाटेच्या सुमारास हे चौथे बछडे ही मादी घेऊन गेली.
---------
जुन्नर फॉर्म्युला तिसऱ्यांदा यशस्वी
मादी आणि तिच्या बछड्यांच्या भेटीचा प्रयोग जुन्नर तालुक्यात वनविभाग करीत आहे. बिबट्याचे बछडे सापडल्यानंतर हे बछडे कॅरेटमध्ये ठेऊन ते बिबट्याच्या मादीच्या स्वाधीन केले जातात. जेणेकरून बछड्याच्या ताटातुटीने त्यांची आई हिंसक होऊन नागरिकांवर हल्ले हल्ले करणार नाही. हा जुन्नर फॉर्म्युला निफाड तालुक्यात तिसºयांदा यशस्वी झाला आह. यावर्षी येवला वन विभागाने निफाड तालुक्यातील ब्राम्हणवाडे , शिवरे येथे अशाच पद्धतीने बछडे तिच्या आईच्या ताब्यात दिले होते तर नागापूर येथे यशस्वी झालेल्या हा तिसरा प्रयोग आहे. येवला वनविभागाने मायलेकरांची भेट घडवून आणण्याच्या या तिसºया प्रयोगाचे निफाडकरांनी कौतुक केले आहे. (२७ निफाड)

Web Title: The meeting was organized by Yeola Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक