उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:44+5:302021-09-16T04:18:44+5:30

सिन्नर : सेझ डी नोटिफिकेशन, बंद उद्योग सुरू करण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय व औद्योगिक वसाहतीचे रस्ते, पाणी व वीज प्रश्न ...

A meeting will be held with the Deputy Chief Minister to sort out the issues of the entrepreneurs | उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

googlenewsNext

सिन्नर : सेझ डी नोटिफिकेशन, बंद उद्योग सुरू करण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय व औद्योगिक वसाहतीचे रस्ते, पाणी व वीज प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात संबंधित विभागाचे मंत्री, अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिले. सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीमध्ये (स्टाइस) उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात कोकाटे बोलत होते. प्रशासक मंडळाच्या अध्यक्ष सुधा माळोदे (गडाख), उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी अध्यक्ष पंडितराव लोंढे, अविनाश तांबे, संचालक सुनील कुंदे, मीनाक्षी दळवी, रामदास दराडे, प्रभाकर बडगुजर, व्यवस्थापक कमलाकर पोटे, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता डोंगरे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुसळगावचे उपसरपंच अनिल सिरसाट आदी उपस्थित होते.

इन्फो...

स्टाइसने राजकारणाचा अड्डा उद्ध्वस्त करावा : दिलीप शिंदे

वसाहतीचे अध्यक्ष असताना शासनदरबारी अनेक समस्या मांडून त्या मी सोडवल्या आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांत वसाहतीमध्ये दहशत व राजकारण वाढल्याने उद्योजक समस्या घेऊन येण्यास धजावत नव्हते. स्टाइसने राजकारणाचा अड्डा उद्ध्वस्त करून उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. नाशिक-पुणे, नाशिक-शिर्डी या चौपदरी रस्त्यांबरोबरच समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग, नाशिक-पुणे रेल्वेचे सिन्नरजवळ दोन किमी लांबीचे होत असलेले स्टेशन, त्याचप्रमाणे ओझर व शिर्डी विमानतळांना जोडणारा रस्ता चौपदरी करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेली मागणी या सर्वांमुळे उद्योगनगरीला पोषक वातावरण तयार होणार असून, त्याचा फायदा घेत सूर्यभान गडाख नानांनी उभी केलेली वसाहत आशिया खंडात नावारूपाला येईल याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही कोकाटे यांनी केले. मुसळगाव ग्रामपंचायतीचा प्रतिनिधी औद्योगिक वसाहतीवर घेण्याची मागणी उपसरपंच अनिल सिरसाट यांनी केली, तर विष्णू खताळे यांनी वारंवार वीजपुरवठा खंडित वीजपुरवठ्याची समस्या मांडली. त्यावर आमदार कोकाटे यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना केल्या तसेच २२० केव्ही क्षमतेचे वीज केंद्र सुरू करण्याबाबत शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. क्रीडा संकुलात उद्योजकांसाठी क्लबसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला उद्योजिका, बचतगटांसाठी पॅकिंग व विक्रीसाठी क्लस्टर उभारण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. यावेळी विलास मोगल, प्रवीण देशमुख, अण्णा पाटील, कैलास वाकचौरे, सुनील जोंधळे, शिवाजी आवारे, अरुण डावखर, अनिल असावा, सुभाष बडगुजर, शिवाजी चासकर, रवि मोगल, अभिषेक गडाख, तुषार गडाख आदींसह उद्योजक उपस्थित होते. प्रास्ताविक अविनाश तांबे यांनी केले.

-----------------------

फोटो ओळी : सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांच्या मेळाव्यात बोलताना आमदार माणिकराव कोकाटे. व्यासपीठावर प्रशासकीय मंडळ अध्यक्ष सुधा माळोदे, नारायण पाटील, संजय शिंदे, विजय गडाख, बाळासाहेब वाघ, पंडितराव लोंढे, अविनाश तांबे, सुनील कुंदे, मीनाक्षी दळवी आदी.

140921\205014nsk_55_14092021_13.jpg

सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या उद्योजकांच्या मेळाव्यात बोलतांना आमदार माणिकराव कोकाटे. व्यासपीठावर प्रशासकीय मंडळाध्यक्ष अध्यक्ष सुधा माळोदे, नारायण पाटील,  संजय शिंदे,  विजय गडाख,  बाळासाहेब वाघ,  पंडितराव लोंढे, अविनाश तांबे,  सुनील कुंदे, मिनाक्षी दळवी आदि. 

Web Title: A meeting will be held with the Deputy Chief Minister to sort out the issues of the entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.