कळवणला कामगार सेनेचा मेळावा
By admin | Published: February 10, 2016 10:46 PM2016-02-10T22:46:21+5:302016-02-10T22:48:29+5:30
कळवणला कामगार सेनेचा मेळावा
कळवण : येथे महाराष्ट्र राज्य एस. टी. कामगार सेनेचा कळवण आगारात कामगार मेळावा संपन्न झाला. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस सुनील गुणाचार्य म्हणाले की, राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतन करार लागू होण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे प्रयत्न करू. एस. टी. महामंडळाचे शासनाकडे अनेक वर्षांपासूनचे थकलेले ३५२ कोटी रावते यांनी महामंडळाला मिळवून दिले आहेत. त्यामुळे यंदा पहिल्यांदा एस. टी. कामगारांना दिवाळी बोनस मिळाला आहे.
कार्यक्र मास प्रमुख अतिथी म्हणून कामगार सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख शिवाजी भोर, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्याम इंगळे, विभागीय सचिव देवा सांगळे, माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनावणे, तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, शहरप्रमुख साहेबराव पगार, कळवण आगार अध्यक्ष दत्तू ढुमसे, सरचिटणीस राजेंद्र पगार आदि उपस्थित होते.
यावेळी शिवाजी भोर, लालचंद सोनवणे, रामभाऊ मिस्तरी, कारभारी अहेर, भाऊलाल तांबडे, जितेंद्र वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी कळवण एस. टी. आगारातील राजेंद्र सोनवणे, डी. ए. गावित, एम. आर. पगार, के. डी. भारती, पी. आर. खैरनार, शिवसेना उपतालुकाप्रमुख गिरीश गवळी, संभाजी पवार, अंबादास जाधव, विनोद मालपुरे, किशोर पवार, विनोद भालेराव, प्रकाश
अहेर, अण्णा पगार, शीतलकुमार अहिरे, दशरथ बच्छाव, राकेश
बच्छाव, सुनील पगार, सचिन पगार, नरेंद्र पगार, ललित अहेर, नाना रावले, पंकज मेने आदिंसह कामगार, प्रवासी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी संजय रौंदळ यांनी केले. (वार्ताहर)