येवला पंचायत समितीची सभा शांततेत
By admin | Published: December 21, 2014 11:13 PM2014-12-21T23:13:08+5:302014-12-21T23:14:27+5:30
येवला पंचायत समितीची सभा शांततेत
येवला : पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत तालुका कृषी विभाग, राज्य परिवहन महामंडळ, वन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती प्रकाश वाघ होते.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शहरी विभागाचे सहायक अभियंता रीजवान व ग्रामीण विभागाचे सहायक अभियंता झोले हे पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहत नाहीत जे प्रतिनिधी पाठवले जातात त्यांना कोणतीही े माहिती देता येत नाही. सभेस उपस्थित प्रतिनिधी यांना देवाळणे गावाची माहिती विचारली असता ते देवळा गावाबद्दल बोलू लागल्या. याबाबत सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली यापुढे सभेस सहायक अभियंता यानी स्वत: उपस्थित राहावे, अशी सूचना सभापती प्रकाश वाघ यांनी केली.
तालुका कृषी विभागाकडील विविध योजनांची महत्त्वपूर्ण माहिती उपस्थित प्रतिनिधींनी दिली. त्यामध्ये गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, टंचाई कृती आराखडा, राष्ट्रीय कृषी विमा योजना, कांदा चाळ योजना यांची माहिती देण्यात आली. पंचायत समितीच्या कृषी विभागाने विशेष घटक योजनेचे अधिकाधिक प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पंचायत समिती सदस्य रतन बोरनारे यांनी पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. औटे यांनी आडगाव येथील रु ग्णास चार तास उपचार न करता बसवून ठेवल्याने त्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी जऊळके प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर सोनावणे , शिक्षक एन.बी.केदारे सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)