इगतपुरी तालुक्यात बैठका, व्यूहरचनांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:52 PM2020-12-23T21:52:46+5:302020-12-24T00:59:35+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने या आठही गावात राजकीय व्यूहरचनांना वेग आला आहे. काही गावात बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत, तर काही गावात रंगतदार सामना होण्याची चिन्हे आहेत. सरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने या आठही गावात सर्वच इच्छुक सरपंचपदाचा दावेदार म्हणून राजकीय पावले टाकत आहेत.

Meetings in Igatpuri taluka, speed up strategies | इगतपुरी तालुक्यात बैठका, व्यूहरचनांना वेग

इगतपुरी तालुक्यात बैठका, व्यूहरचनांना वेग

Next
ठळक मुद्देसरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने इच्छुकांसमोर पेच

घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने या आठही गावात राजकीय व्यूहरचनांना वेग आला आहे. काही गावात बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत, तर काही गावात रंगतदार सामना होण्याची चिन्हे आहेत. सरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने या आठही गावात सर्वच इच्छुक सरपंचपदाचा दावेदार म्हणून राजकीय पावले टाकत आहेत.

सरपंचपद आरक्षण निश्चित होऊन निवडणुका झाल्या असत्या तर सरपंच आरक्षणाच्या जागेवर लक्ष केंद्रित करून निवडणुका झाल्या असत्या. परंतु, आता सरपंचपदांचे आरक्षण लांबल्याने गावपातळीवर पॅनल निर्मिती करण्यात अडचणी येत आहेत.

            सरपंचपदांचे आरक्षण काय निघते, हे अनिश्चित असल्याने सध्या तरी वॉर्डावॉर्डात चुरस आहे. संभाव्य आरक्षण गृहीत धरून पॅनल निर्मिती होत आहे. सरपंचपदाची माळ गृहीत धरून वॉर्डावॉर्डात चुरस होण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतीत नेत्यांची तर काही ग्रामपंचायतीत सामाजिक कार्यकर्त्यांची कसरत ठरत आहे. काही गावात निवडणूक बिनविरोध होण्यासाठी तर काही गावात अटीतटीच्या निवडणुका होत असल्याने व्यूहरचना आखल्या जात आहेत.

इगतपुरी तालुक्यात वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुकांना सुरुवात होत आहे. वर्षभरात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, बाजार समिती, सहकारी सोसायटीच्या निवडणुका होणार आहेत. सुरुवातीला आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यात टिटोली, बलायदुरी, भरवीर बुद्रुक, कुर्नोली, शेणवड खुर्द, गरुडेश्वर, फांगुळगव्हाण, तळोघ या पंचायतींचा समावेश आहे.

Web Title: Meetings in Igatpuri taluka, speed up strategies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.