रेल्वे प्रवाशांचा मेगा ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:00 AM2017-08-30T01:00:16+5:302017-08-30T01:00:23+5:30
आसनगावजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात आणि मुंबईतील मुसळधार पावसामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाºया सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल झाले. काही गाड्यांना इगतपुरीहून माघारी परतावे लागले तर इतर गाड्या मनमाड व नाशिकरोड स्थानकावरच थांबविण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईला जाणाºया प्रवाशांसाठी महामंडळाने महामार्ग स्थानकातून २५ पेक्षा जास्त गाड्यांची व्यवस्था केली होती.
नाशिकरोड : आसनगावजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेला अपघात आणि मुंबईतील मुसळधार पावसामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाºया सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे मेगा हाल झाले. काही गाड्यांना इगतपुरीहून माघारी परतावे लागले तर इतर गाड्या मनमाड व नाशिकरोड स्थानकावरच थांबविण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईला जाणाºया प्रवाशांसाठी महामंडळाने महामार्ग स्थानकातून २५ पेक्षा जास्त गाड्यांची व्यवस्था केली होती. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे सात डबे आसनगाव-वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली, तर मुंबईहून येणाºया गाड्यांना कल्याणमार्गे मनमाडकडे वळविण्यात आले. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे आणि मुंबईहून मनमाडकडे जाणाºया प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरीतून माघारी पाठविण्यात आल्या तर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकावरच थांबविण्यात आल्याने रेल्वेच्या प्रवाशांना बसचा आसरा घ्यावा लागला. सकाळी आपल्या नियोजित वेळेनुसार राज्यराणी एक्स्प्रेस आणि पंचवटी एक्स्प्रेस या गाड्या निघाल्या. मात्र या गाड्यांना इगतपुरीत थांबविण्यात आले. तर त्यानंतरही गोदावरी एक्स्प्रेस मनमाड येथूनच रद्द करण्यात आली. सेवाग्राम गाडी नाशिकरोड स्थानकात थांबविण्यात आली तर पंजाब एक्स्प्रेसही इगतपुरीहून मनमाडला परतली. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली. मनमाडहून सुटणारी लोकमान्य टिळक गोदावरी एक्स्प्रेस गाडी रद्द करण्यात आली. तर नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस व जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला मनमाड स्थानकावरच थांबविण्यात आले.
प्रवाशांची लूट
नाशिकरोड बसस्थानकातून महामार्ग बसस्थानकासाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग गाठून पुढे एस.टी. बसने प्रवास केला. मात्र रेल्वे गाड्या पूर्णपणे खोळंबल्याचा फायदा रिक्षा, टॅक्सी चालकांनी घेतला. अवाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांना महामार्ग स्थानकावर सोडले जात होते. काही टॅक्सीचालकांनी तर कसाºयासाठी थेट ५०० रुपये प्रतिसीट इतकी भाडे आकारणी केली. नाशिकरोडहून महामार्ग बसस्थानक आणि तेथून पुन्हा बसचा प्रवास करण्यापेक्षा अनेकांनी टॅक्सीने कसारा-कल्याण स्थानक गाठले.
पंचवटी, गोदावरी रद्द
मुंबईहून कल्याणमार्गे व मनमाड, पुणे-दौंडमार्गे अनेक रेल्वे वळविण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. नाशिककरांच्या दृष्टीने मुंबईला जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. बुधवारीदेखील पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या मुंबईला जाणाºया रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. गाड्या रद्द झाल्याने रेल्वे प्रवासाच्या वेळेत सात ते आठ तासाचा कालावधी वाढल्याने रेल्वे प्रवासी त्रस्त झाले होते. अपघातामुळे इगतपुरीपासून माघारी फिरलेली राज्यराणी, पंचवटी व लांब पल्ल्याच्या गाड्या या पुन्हा मनमाडमार्गे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आल्याने दुपारी १२ वाजेपर्यंत रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी होती.
नाशिकरोड स्थानकात गर्दी
नाशिककर प्रवाशांसाठी मुंबईल जाण्यासाठी महत्त्वाची असलेल्या राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेस या रेल्वे घोटी व इगतपुरी रेल्वे स्थानकांत थांबविण्यात आल्या होत्या. मंगला एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकातुन पुन्हा मनमाड, पुणे-दौड, कल्याण मार्गे मुंबईकडे वळविण्यात आली होती. यामुळे रेल्वे प्रवासाच्या वेळेत सात ते आठ तासाचा कालावधी वाढल्याने रेल्वे प्रवासी त्रस्त झाले होते. सकाळी साडेअकरा नंतर घोटी-इगतपुरीवरून आलेली राज्यराणी व पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा माघारी मनमाडला पाठविण्यात आली. तर मनमाडवरून गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती.
मुंबईकडून कल्याणमार्गे वळविण्यात आलेल्या रेल्वे
दुरांतोला झालेल्या अपघातामुळे मुंबईहून सुटणाºया जनशताब्दी, विदर्भ, अमृतसर, ज्ञानेश्वरी डिलक्स, कृषिनगर, हावडा मेल, जबलपूर या भुसावळकडे जाणाºया गाड्या कल्याण, पुणे, मनमाडमार्गे वळविण्यात येऊन पुढे रवाना करण्यात आल्या. तर जनशताब्दी, पुणे एक्स्प्रेस, नंदीग्राम, पंचवटी, राज्यराणी, गोदावरी, पंजाब मेल, नागपूर, दुरांतो, देवगिरी, अमृतसर, महानगरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या.
भुसावळकडून मनमाडमार्गे वळविण्यात आलेल्या रेल्वे
भुसावळकडून नाशिकरोड मार्गे मुंबईला जाणाºया मंगला एक्स्प्रेस, हावडा, सीएसटी, दुरांतो, हावडा मेल, जनशताब्दी, महानगरी, पुष्पक, गीतांजली, तुलसी वाराणसी सुपरफास्ट, भुवनेश्वर एक्स्प्रेस आदी रेल्वे गाड्या मनमाड, पुणे, कल्याण मार्गे मुंबईला रवाना करण्यात आल्या. तर तपोवन, कामायनी, गरीबरथ या रेल्वे नाशिकरोड स्थानकापर्यंतच्या विविध स्थानकांमध्ये थांबविण्यात आल्या होत्या.