रविवारी नाशकातील प्रमुख रस्त्यांवर ‘मेगाब्लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:12 PM2018-02-16T15:12:07+5:302018-02-16T15:14:19+5:30
नाशिक मॅरेथॉन पाच गटात होणार असून, त्यात तीन किलो मीटर, पाच, दहा, २१ व ४२ किलो मीटरचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक गटासाठी काही रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. त्यात प्रामुख्याने त्र्यंबकरोड, महात्मानगर, सीबीएस. अशोकस्तंभ, गंगापूररोड,
नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी आयोजीत करण्यात आलेल्या नाशिक मॅरेथॉन स्पर्धेसाठी शहरातील प्रमुख मार्ग तब्बल आठ तास सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची अधिसुचना पोलीस आयुक्तालयाने जारी केली असून, शहरांतर्गंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहतुकीसाठी बंद राहणारे मार्ग शहरातील मध्यवस्तीत असल्यामुळे पेपर विक्रेते, दूधवाल्यांची पायपीट होणार असून, पर्यायी मार्गांवरही वाहतुक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाशिक मॅरेथॉन पाच गटात होणार असून, त्यात तीन किलो मीटर, पाच, दहा, २१ व ४२ किलो मीटरचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक गटासाठी काही रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. त्यात प्रामुख्याने त्र्यंबकरोड, महात्मानगर, सीबीएस. अशोकस्तंभ, गंगापूररोड, टिळकवाडी, शरणपुररोड, जुना गंगापुरनाका, जेहान सर्कल, एबीबी सर्कल, आयटीआय सर्कल, पपया नर्सरी, पिंपळगाव बहुला, हॉटेल संस्कृती आदी रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाºयांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रमुख मार्गावरील वाहतुक अन्य मार्गावरून वळविल्यामुळे पर्यायाने या मार्गांवर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.
चौकट====
असे आहेत पर्यायी मार्ग
* भवानी सर्कल (मायको सर्कल) ते त्र्यंबक नाका (मोडक सिग्नल) या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आल्याने नागरिकांनी गडकरी सिग्नल ते चांडक सर्कल ते मायको सर्कल या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
* त्र्यंबक नाका (मोडक सिग्नल) ते अशोक स्तंभ ते जेहान सर्कल ते एबीबी सर्कलकडे जाणा-या रस्त्यांच्या डाव्याबाजुकडील लेनवर मॅरेथॉनचे स्पर्धक धावणार असल्याने सदर लेन वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्याच्या उजव्या लेनचा वापर येण्या-जाण्यासाठी करावा.
* एबीबी सर्कल ते पपया नर्सरी ते हॉटेल संस्कृतीकडे जाणा-या रस्त्यांच्या डाव्या बाजुचा वापर हा येणा-या जाणा-या वाहनांनी करावयाचा आहे. हॉटेल संस्कृती ते पपया नर्सरी ते एबीबी सर्कल ते सिब्बल हॉटेल ते भवानी सर्कल ते गोल्फ क्लबकडे येणा-या डाव्या बाजुकडील लेनवर स्पर्धक धावणार असल्याने सदरची लेन वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद असणार आहे.