भुजबळ यांच्या मतदार संघावर मुनगुट्टीवार यांची मेहेरनजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 02:09 PM2018-03-16T14:09:54+5:302018-03-16T14:09:54+5:30
रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या भरीव निधीतून येवला मतदार संघातील रस्त्यांचा मेकओव्हर होणार आहे तसेच नागरिकांना दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार
नाशिक : येवला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात १०२ कोटी ५२ लाख रूपयांच्या निधीस मंजूरी मिळाली आहे. त्यात प्रामुख्याने रस्त्यांच्या बळकटीकरणासाठीच हा निधी असून, त्यातून तालुक्यातील दळणवळण सुविधा अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे.
येवला तालुक्यातील मुखेड-जळगाव नेऊर-सातारे-पिंपरी-ठाणगाव-गुजरखेडे-बाळापुर ते राज्य महामार्ग ८ या रस्त्यासाठी २ कोटी ८० लक्ष रुपये; नाशिक-येवला- देशमाने ते मुखेड फाटा भाग या रस्त्यासाठी २ कोटी ४५ लक्ष रुपये; सावरगांव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे महालखेडा- दत्तवाडी-शिरवाडे-वाकदरोड या रस्त्यासाठी १ कोटी ९६ लक्ष रुपये; नाशिक-निफाड- येवला या रस्त्यातील येवला तालुक्यातील भागासाठी १ कोटी ६३ लाख रुपये; प्रमुख जिल्हा मार्ग ७२ या रस्त्यासाठी १४ कोटी २ लक्ष रुपये निधीच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच सावरगांव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे महालखेडा-दत्तवाडी-शिरवाडे-वाकदरोड या रस्त्यासाठी १ कोटी ३० लक्ष रुपये, धुळगाव-सातारे-पिंपळगांव लेप- जऊळके- शिरसगाव लौकी- शेळकेवाडी रोड या रस्त्यासाठी ८५ लक्ष रुपये, देशमाने-मानोरी-मुखेड-महालखेडा-निमगाव मढ-नाटेगांव रस्त्यासाठी ८० लक्ष रुपये, पाटोदा- सावरगाव-नगरसूल-वाईबोथी- भारम रोड या रस्त्यासाठी ६४ लक्ष रुपये, सावरगांव- भाटगांव- रायते- चिचोंडी-निमगाव मढ रस्त्यासाठी ६३ लक्ष रुपये निधीच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
निफाड तालुक्यातील लासलगाव रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपूल किमी १९२ ते १७२ लासलगांव- विंचूर या रस्त्यासाठी ६९ कोटी ७६ लक्ष रुपये तसेच म्हसोबा माथा फाटा ते धारणगांव खडक ते सारोळेथडी या रस्त्यासाठी ५ कोटी ५० लक्ष रुपये अशा एकूण १०२ कोटी ५२ लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या भरीव निधीतून येवला मतदार संघातील रस्त्यांचा मेकओव्हर होणार आहे तसेच नागरिकांना दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती भुजबळ यांचे स्वीय सचिव बाळासाहेब लोखंडे यांनी दिली.