मालेगावी ‘समाज विकास’चा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:16 AM2017-08-03T00:16:42+5:302017-08-03T00:45:10+5:30

मविप्रच्या सभासदांचे हित लक्षात घेवून त्यांच्यासाठी स्वतंत्र सभासद कक्ष उभारला जाईल. सभासदांच्या मुलांना रांगेत उभे न ठेवता थेट सेवा देऊ, ज्येष्ठ सभासदांवर मोफत उपचार केला जाईल, असे प्रतिपादन अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले.

Melgaavi 'Social Development' rally | मालेगावी ‘समाज विकास’चा मेळावा

मालेगावी ‘समाज विकास’चा मेळावा

Next

मालेगाव : मविप्रच्या सभासदांचे हित लक्षात घेवून त्यांच्यासाठी स्वतंत्र सभासद कक्ष उभारला जाईल. सभासदांच्या मुलांना रांगेत उभे न ठेवता थेट सेवा देऊ, ज्येष्ठ सभासदांवर मोफत उपचार केला जाईल, असे प्रतिपादन अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले.

येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या समाज विकास पॅनलच्या तालुका मेळाव्यात अ‍ॅड. ठाकरे बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रतापदादा सोनवणे हे होते. व्यासपीठावर डॉ. विलास बच्छाव, रवींद्र पगार, दिलीप मोरे, राजेंद्र मोगल, बाळासाहेब कोल्हे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, डी. बी. मोगल, डॉ. अशोक बच्छाव, सुचेता बच्छाव, निर्मला खर्डे, प्रदिप गायकवाड, अतुल अहिरे, भास्कर शिंदे, नारायण कोर, काशिनाथ पवार, दशरथ निकम, मनिषा पवार, समाधान हिरे, अशोक बच्छाव, विकी खैरनार, संजय निकम, चंद्रशेखर हिरे आदि उपस्थित होते. डॉ. ठाकरे पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात संस्थेत मोठे गौडबंगाल झाले आहे. सभासदांचे हित लक्षात घेवून विविध योजना राबविल्या जाणार आहेत. यावेळी माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला तालुक्यातील सभासद उपस्थित होते.

Web Title: Melgaavi 'Social Development' rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.