तेली समाजातर्फे गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:07 AM2019-01-08T01:07:35+5:302019-01-08T01:07:49+5:30

कुटुंबाचा आधार स्त्री असून, ती सरस्वती, काली, ललिता, मैत्रिण, अर्धांगिनी, जन्मदात्री, आरोग्यदात्री, सिद्धदात्री अशा विविध रूपात कुटुंबात वावरत असते, असे प्रतिपादन सुरेखा बोºहाडे-गायखे यांनी केले.

 The melodious celebration by the Teli community | तेली समाजातर्फे गुणगौरव सोहळा

तेली समाजातर्फे गुणगौरव सोहळा

Next

नाशिकरोड : कुटुंबाचा आधार स्त्री असून, ती सरस्वती, काली, ललिता, मैत्रिण, अर्धांगिनी, जन्मदात्री, आरोग्यदात्री, सिद्धदात्री अशा विविध रूपात कुटुंबात वावरत असते, असे प्रतिपादन सुरेखा बोºहाडे-गायखे यांनी केले.  श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथीनिमित्त नाशिकरोड तेली समाज मंडळाच्या वतीने समाजातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी कुटुंब सौख्याची अमृतवेल-स्त्री या विषयावर व्याख्यान देताना सुरेखा बोºहाडे बोलत होत्या. सकाळी बिटको चौकात प्रतिमापूजन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव कर्डिले, नगरसेवक गजानन शेलार, सागर चौथेपाटील, डॉ. भूषण कर्डिले, व्यापारी बॅँकेचे संचालक मनोहर कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक किरण वालझाडे यांनी केले. आभार राजेंद्र चौधरी यांनी मानले. यावेळी तेली समाज मंडळाचे अध्यक्ष महेश बारगजे, गोरख शिरसाठ, किरण वालझाडे, दत्तात्रेय चौधरी, श्रीराम वाकचौरे, कैलास कोरडे, शरद वालझाडे, शरद चौधरी, प्रमोद नगरकर, आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तेली समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुमन बागले, स्वप्नील शेलार, मनोज घोंगे, संतोष कदम, सुनील शिरसाठ, राजेंद्र चौधरी, भानुदास चौधरी, नंदुनाना पवार, राजेंद्र गायकवाड, श्रीकांत वालझाडे, सर्वांगीण महिला मंडळ यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  The melodious celebration by the Teli community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक