कानठळ्या बसवणाऱ्या भांड्याच्या आवाजातूनही उमटले मधूर संगीत ; विद्यार्थ्यांच्या किचन बँण्डने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:05 PM2020-06-25T19:05:27+5:302020-06-25T19:10:01+5:30
किचनमधील भांड्यातून मधूर संगिताची निर्मिती करून नाशिकच्या सृजनशील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी घरी राहूनच अध्ययानासोबत आपसात्मक ऑनलाईन संवादातून किचनमधील वेगवेगळ्या साहित्याचा वापर करीत संगीत बँड तयार करून त्यातून शाळेच्या वैविध्यपूर्ण संगीत रचनांचे निर्मिती केली आहे.
नाशिक : ऐरवी घरातील स्वयंपाक घरात भांडे पडले तरी कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने त्रास होतो. परंतु, याच किचनमधील भांड्यातून मधूर संगिताची निर्मिती करून नाशिकच्या सृजनशील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहे. अशावेळी विद्यार्थ्यांकडून घरी राहूनच अध्ययानासोबतच वेगवेगळ्या सर्जनशील कलाकृती, कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी आपसात्मक ऑनलाईन संवादातून किचनमधील वेगवेगळ्या साहित्याचा वापर करीत संगीत बँड तयार करून त्यातून शाळेच्या वैविध्यपूर्ण संगीत रचनांचे निर्मिती केली आहे.
सध्याच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये क्रियाशिलता वाढावी विविध शाळांकडून वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांमध्ये शाळेचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्यातूनच विध्यार्थ्यांना विविध साधनांचा वापर करून वैविध्यपूर्ण कलात्मक रचान तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. अशाचप्रकारे इस्पॅलियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रामध्ये या प्लास्टिक बँड, रोबोट बँड, बांबू बँड, टॅप बँड असे विविध वाद्यांतून संगीतमय क्रियाशीलता दाखवून दिली. संगीत शिक्षक नरेश लोखंडे व विकी रोहम यांनी ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या पालकांना फोन करून कुठला साऊंड हवा आहे, आणि तो रेकॉर्ड कसा करायचा याचे मार्गदर्शन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी चक्क स्वयंपाक घरातील साहित्याचा वापर करून शाळेच्या वर्धापन दिनी ‘आनेवाला पल जानेवाला है’ या गीता बरोबरच दोन देश देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून कल्पकता आणि क्रियाशिलतेचे दर्शन घडविले .