सभासदांनी होतकरू मुले दत्तक घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:09 AM2017-10-28T00:09:33+5:302017-10-28T00:09:40+5:30
येथील प्रेरणा एकता बहुद्देशीय सामाजिक संंस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी प्रेरणाच्या प्रत्येक सभासदाला गरीब व होतकरू मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन केले.
नाशिक : येथील प्रेरणा एकता बहुद्देशीय सामाजिक संंस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी प्रेरणाच्या प्रत्येक सभासदाला गरीब व होतकरू मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन केले. स्नेहमेळाव्यास अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड , तसेच महाराष्ट्रभर सध्या विविध शासकीय खात्यांमध्ये कार्यरत असलेले सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी तसेच नुकतेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले अधिकारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष कैलास दराडे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत मागील आठवणींना उजाळा दिला. तसेच भविष्यात संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाºया विविध उपक्र मांची रु परेषा सांगितली. यावेळी संजय दराडे यांनी मनोगत व्यक्त करताना आदिवासी आणि ग्रामीण भागात काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संजय दराडे व विशाल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. संंस्थेचे डॉ. राजेंद्र सांगळे व तहसीलदार सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. कैलास दराडे यांनी आभार मानले. संस्थेचे सहसचिव विष्णू वारुं गसे यांनी समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप, तसेच कॅन्सरग्रस्त रु ग्णांना मदत करणाºया ट्रस्टला देणगी, तसेच संस्थेचे बचत गट तयार करून वेगवेगळ्या उपक्रमांविषयी माहिती दिली.