‘त्या’ तीन पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व अखेर रद्द
By admin | Published: March 6, 2017 01:43 AM2017-03-06T01:43:47+5:302017-03-06T01:43:58+5:30
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या सभेत कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर व अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या सर्वसाधारण सभेत मागील
सभेचे इतिवृत्त एकमताने मंजूर झाल्याने पदच्युत कार्यवाह मिलिंद जहागीरदार, कार्याध्यक्ष विनया केळकर व अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
या सर्वसाधारण सभेत संबंधित पदाधिकाऱ्यांकडून वाचनालयाचे नूतनीकरण करताना करासहीत दाखविण्यात आलेला सुमारे
१७ लाखांचा अतिरिक्त खर्च
वसूल करून त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचा
ठरावही यावेळी एकमताने मंजूर
करण्यात आला. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालयाची सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली.