खाऊच्या पैशातून ‘आठवणीचं झाड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:15 AM2018-04-26T00:15:51+5:302018-04-26T00:15:51+5:30
आपल्या शाळेसाठी एक झाड व त्याच्या संरक्षणासाठी ट्री-गार्ड देऊन वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी आपली वृक्षाच्या रूपातील आठवण आयुष्यभरासाठी मागे ठेवली आहे.
निफाड : आपल्या शाळेसाठी एक झाड व त्याच्या संरक्षणासाठी ट्री-गार्ड देऊन वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी आपली वृक्षाच्या रूपातील आठवण आयुष्यभरासाठी मागे ठेवली आहे. निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या इयत्ता चौथीच्या कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी पहिलीपासून चौथीपर्यंत ज्या शाळेत आपण ज्ञानग्रहण केले, तेथील बालपणीच्या आठवणी कायम स्मरणात राहण्यासाठी ‘आठवणीचं झाड’ शाळेत लावून ते जोपासण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. मुले एवढ्यावरच थांबली नाही तर या चिमुकल्यांनी आपल्या खाऊचे पैसे जमा करून झाडाच्या संरक्षणासाठी ट्री-गार्ड खरेदी करून मुख्याध्यापक अलका जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या उपक्रमास न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त अॅड. ल. जि. उगावकर, वि. दा. व्यवहारे, राजेंद्र राठी, किरण कापसे, अॅड. दिलीप वाघावकर, राजेश सोनी, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस.बी. थोरात, केंद्रप्रमुख व्ही.के. सानप उपस्थित होते. या उपक्र मासाठी शिक्षक गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.
बेसुमार होणाया जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधण्यासाठी चिमुकल्यांनी झाड लावून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी मुलांनी झाडे लावा-झाडे जगवा; झाडे लावा दारोदारी, आरोग्य येईल घरोघरी; एक दोन तीन चार, झाडे लावा फार फार अशा घोषणा दिल्या.