गणिततज्ज्ञ कापरेकरांच्या स्मृतींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:58+5:302020-12-22T04:13:58+5:30

धनंजय रिसोडकर लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : प्रगाढ बुद्धिमत्तेच्या जोरावर जागतिक दर्जाचे गणिततज्ज्ञ म्हणून प्रख्यात झालेल्या द. रा. ...

Memories of mathematician Kaparekar | गणिततज्ज्ञ कापरेकरांच्या स्मृतींची

गणिततज्ज्ञ कापरेकरांच्या स्मृतींची

Next

धनंजय रिसोडकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : प्रगाढ बुद्धिमत्तेच्या जोरावर जागतिक दर्जाचे गणिततज्ज्ञ म्हणून प्रख्यात झालेल्या द. रा. कापरेकर यांनी शोधून काढलेला जादुई कापरेकर स्थिरांक आजही जगभरात ‘कापरेकर कॉन्स्टंट’ म्हणून ओळखला जातो. एक महान गणिततज्ज्ञ नाशिकच्या भूमीत विसावल्याला पस्तीस वर्षे उलटूनही त्यांच्या स्मृतीच्या खाणाखुणा नाशिकमध्ये कुठेच उरल्या नसल्याने त्यांची अवस्था आता ‘नाही चिरा नाही पणती’ अशीच झाली आहे.

भारतातील सर्वश्रेष्ठ गणिततज्ज्ञांमध्ये पुरातन काळातील आर्यभटापासून ते दोन शतकापूर्वीच्या श्रीनिवास रामानुजन यांच्यापर्यंत अनेकांची गणना होते; मात्र रामानुजन यांच्यानंतरच्या काळातील एका मराठमोळ्या महान गणिततज्ज्ञाच्या नशिबी मात्र नाशिकसह राज्यभरात कायम उपेक्षाच आली, गणितातले पदव्युत्तर शिक्षण घेतले नसतानाही कापरेकर यांनी कित्येक शोध लावले, त्या शोधांबद्दल त्यांना ‘गणितानंद’ ही उपाधीदेखील मिळाली होती.

इन्फो

नाशिकच होती कर्मभूमी

डहाणू येथे १७ जानेवारी १९०५ रोजी जन्म झालेल्या या अवलियाचे नाव होते दत्तात्रय रामचंद्र कापरेकर. वडिलांनी ज्योतिषाचा अभ्यास करताना शिकवलेल्या आकडेमोडीनेच त्यांना गणिताची गोडी लागली होती. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला पदवी घेताना गणिताच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला दिला जाणाऱ्या रँग्लर परांजपे पुरस्काराने गौरविण्यात आले होते. बी.एस्सी.मॅथ्सची पदवी घेताच, कापरेकर हे नाशिकनजीकच्या देवळाली येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी नाशिकलाच कर्मभूमी बनवले. अनेकानेक शोध आणि संशोधन करुनही विस्मृतीत गेलेल्या कापरेकर यांचे १९८६ साली देवळालीतच निधन झाले.

इन्फो

आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

१९५३ साली स्क्रिप्टा मॅथेमॅटिका या जर्नलमध्ये त्यांचा शोधनिबंध प्रकाशित झाल्यानंतर जगाने त्यांची सर्वप्रथम दखल घेतली. त्यानंतर १९७५ साली सायंटिफिक अमेरिकन या जागतिक कीर्तीच्या विज्ञान मासिकात मार्टिन गार्डनर नावाच्या प्रसिद्ध गणिततज्ज्ञाने कापरेकरांच्या कामाबद्दल लिहिल्यानंतर महाराष्ट्राला त्या गणिततज्ज्ञाचे श्रेष्ठपण उमगले होते. कापरेकरांचे संशोधन काळाच्या खूप पुढे होते. नंबर थिअरी म्हणून आता जिचा गवगवा आहे, त्यातील अनेक मूलभूत शोध कापरेकरांनी स्वतंत्ररीत्या लावले होते. कापरेकरांचे निधन झाल्यावर सगळ्यांना त्यांच्या शोधांची महती समजली. त्यांच्या लेखांच्या मग उजळण्या झाल्या. त्या लेखांच्या आधारावर पुढे अनेक गणिजतज्ज्ञांनी पीएच.डी. मिळवल्या.

इन्फो

कापरेकर कॉन्स्टंट, नंबर्स आणि दत्तात्रय संख्या

जगातली कुठलीही चार अंकी संख्या घेऊन हा प्रयोग करता येतो. त्यांचे उत्तर हे एकतर शून्य येईल किंवा कापरेकर कॉन्स्टंट ६१४७ हेच उत्तर येते. कोणत्याही चार आकडी संख्येतून बनणाऱ्या सर्वात मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत नेल्यास किमान ७ पायऱ्यांमध्ये ६१४७ हाच आकडा येतो. तसेच कापरेकर नंबर्स म्हणजे वर्ग केल्यास येणारी संख्यांची बेरीज ही मूळ संख्येइतकी येते, उदाहरण म्हणून ४५ घेऊ, ४५ चा वर्ग येतो २०२५ आणि २० २५ होतात ४५. अजून एक उदाहरण घेऊ ९ या संख्येचे. ९ चा वर्ग येतो ८१, आणि ८ अधिक १ होतात ९. तसेच ५५ आणि ९९ हे सुद्धा कापरेकर नंबर्स म्हणून ओळखले जातात. तर १३,५७, १६०२, ४०२०४ या संख्यांना दत्तात्रय संख्या म्हणतात. कारण, त्या संख्यांच्या वर्गाचे दोन किंवा अधिक हिस्से केले तर त्यातील प्रत्येक हिस्सा हा पूर्ण वर्ग असतो.

Web Title: Memories of mathematician Kaparekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.