वृक्ष लागवड अन संगोपनातून जपणार निऱ्हाळी यांच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:08+5:302021-05-24T04:14:08+5:30

नाशिक : राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि साने गुरुजींच्या विचारांचे पाईक असलेल्या मधुकर निऱ्हाळी यांच्या स्मृती जपण्यासाठी माणगाव येथील ...

Memories of Nirhali to be preserved through tree planting and care | वृक्ष लागवड अन संगोपनातून जपणार निऱ्हाळी यांच्या स्मृती

वृक्ष लागवड अन संगोपनातून जपणार निऱ्हाळी यांच्या स्मृती

Next

नाशिक : राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि साने गुरुजींच्या विचारांचे पाईक असलेल्या मधुकर निऱ्हाळी यांच्या स्मृती जपण्यासाठी माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात स्मृती वनात पाच झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय त्यांच्या स्नेह्यांनी श्रद्धांजली सभेत घेतला. यातून निसर्ग संवर्धन तर होईलच शिवाय आपलेपणाचा ऑक्सिजन वाढेल अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

निऱ्हाळी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ते राष्ट्र सेवा दलाच्या विचारांचे होते तसेच साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर पगड होता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी झालेल्या निऱ्हाळी यांना कारावासाची शिक्षाही झाली हेाती. नाशिकमध्ये आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी दादासाहेब बिडकर यांच्या बरोबर अनेक वर्षे सपत्नीक योगदान दिले. कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी देहदानाचा फॉर्मही भरला होता. परंतु कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ते शक्य होऊ शकले नाही. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुले, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. निऱ्हाळी यांची शोकसभा नुकतीच ऑनलाईन पार पडली. यावेळी निऱ्हाळी यांच्या स्मृती जपण्यासाठी माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातील येथील वृक्ष स्मृतीवनात पाच वृक्ष लावण्यासाठी व संगोपनासाठी रुपये २५ हजारांचा धनादेश स्मारकाचे प्रतिनिधी वसंत एकबोटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे प्रणेते गजानन खातू, सुधीर देसाई, युवराज मोहिते, संजय मं. गो. सचिव राजन इंदुलकर हे उपस्थित होते.

---

छायाचित्र आर फोटोवर २४ मधुकर निऱ्हाळे

===Photopath===

220521\242222nsk_7_22052021_13.jpg

===Caption===

मधूकर निऱ्हाळी

Web Title: Memories of Nirhali to be preserved through tree planting and care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.