कोरोनाकाळात पुरुषांचाही बायकांकडून छळ; पत्नीविरुद्ध २४ तक्रारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:11 AM2021-06-17T04:11:51+5:302021-06-17T04:11:51+5:30
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरांमध्ये एक ना अनेक कारणांवरून मतभेद होऊन वादविवादाचे प्रसंग घडले. अनेकदा ...
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरांमध्ये एक ना अनेक कारणांवरून मतभेद होऊन वादविवादाचे प्रसंग घडले. अनेकदा वादविवादाला अगदी क्षुल्लक कारणेही पुरेशी ठरल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारींवरून दिसून येते. शहरातील भरोसा सेलकडे (महिला सुरक्षा शाखा) अशाच प्रकारे या काळात महिलांच्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. कधी मोबाइल मग्नता तर कधी कामाचा वाढता व्याप तर पतींकडून कामाच्या व्यापामुळे केली जाणारी चिडचिड अशा विविध कारणांमुळे दाम्पत्यांमध्ये वाद घडले. त्याचप्रमाणे मुलांकडे लक्ष न देणे, स्वयंपाकात चुका करत आई-वडिलांच्या प्रकृतीविषयी काळजी न दाखविल्याचा आरोप करीत २४ पतींकडून त्यांच्या पत्नीविरुद्ध छळ केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे मागील पाच महिन्यांत दाखल झाल्या आहेत. या तक्रारींमधील तथ्य शोधण्याचे मोठे आव्हान आता ‘भरोसा सेल’पुढे उभे राहिले असून, पती-पत्नींचे जाबजबाब नोंदवून घेत तक्रार अर्जांची चौकशी केली जात आहे.
---इन्फो--
सहवासासोबत भांडणेही वाढली
कोरोनाकाळात पती-पत्नींमध्ये सहवास अधिकाधिक वाढला. दोघांनाही एकमेकांसोबत जास्त वेळ घालविण्यास वाव मिळाला; मात्र याचे काही कुटुंबांमध्ये दुष्परिणामही दिसून आले तर काहींनी ही एक चांगली संधी म्हणून एकमेकांची काळजी घेत समजून घेण्याचा प्रयत्नही केला.
---कोट--
पुरुषांकडूनही त्यांच्या पत्नीविरुद्ध तक्रारी आल्या आहेत. तक्रारींमधील कारणे अत्यंत तकलादू स्वरूपातील असून पत्नी काहीही न सांगता माहेरी निघून गेली, मुलांना भेटू देत नाही, फोन उचलत नाही अशा प्रकारच्या कारणांचा यामध्ये समावेश आहे. पती-पत्नींची बाजू ऐकून घेत आलेल्या अर्जांची चौकशी केली जात आहे.
- संगीता निकम, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल
---
भांडणाची ही काय कारणं झाली..?
मुलांच्या अभ्यासाकडे ती सतत दुर्लक्ष करते.
कामाचा व्याप वाढल्याने सतत घरात चिडचिड करीत वृद्ध सासू-सासऱ्यांकडे दुर्लक्ष करते.
नोकरीच्या ठिकाणचा कामाचा किंवा वरिष्ठांविषयीचा राग घरात व्यक्त करणे.
मोबाइलवर सारखे का बोलते? अशा विविध तकलादू कारणांवरून पतींकडून पत्नींविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत.
---पॉइंटर्स---
पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी - २४
महिलांच्या पुरुषांविरुद्ध तक्रारी - ९०७
भरोसा सेलकडे आलेल्या एकूण तक्रारी - ९३१
----इन्फो--
३१ सुना पुुन्हा नांदण्यास....
कोरोनाकाळात उद्भवलेल्या वादविवादाच्या प्रसंगानंतर भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींनंतर पती-पत्नींची समजूत पोलिसांकडून काढण्यात आली. संसारवेल कोमेजू देऊ नये, सप्तपदीत एकमेकांना दिलेल्या वचनांचे स्मरण पोलिसांकडून करून देण्यात आले तसेच बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशनही पोलिसांनी केले. पतीपासून दुरावलेल्या ३१ महिलांचे एप्रिलअखेरपर्यंत मन परिवर्तन करण्यास पोलिसांना यश आले. ९७ दाम्पत्यांमध्ये न्यायालयात समझोता झाला.
===Photopath===
160621\16nsk_52_16062021_13.jpg~160621\16nsk_54_16062021_13.jpg
===Caption===
छळ~लढा