व्यापाऱ्याची फसवणूक ; चौघा जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 09:07 PM2020-12-25T21:07:55+5:302020-12-26T00:37:35+5:30
मालेगाव : टेक्सटाईल मशीन खरेदी व्यवहारात २७ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक व पैशांचा अपहार केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तमिल सेल्वन पेरीया स्वामी, रा. देवांगपूर, ता. त्रिचेनगोडे (तामिळनाडू) या टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग व ट्रेडिंग कंपनीच्या व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे.
सिंधिया मदलियार उरकुट्टी, रा. भिवंडी व अन्य एक, रा. कडपट्टी, जि. नामक्कल, एक कल्याण व एक मालेगावच्या (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी फिर्यादी तमिलकडून रोख रक्कम व ऑनलाइन ट्रान्झेक्शनद्वारे २७ लाख ८ हजार रुपये टेक्सटाइल मशीन न देता फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ हे करीत आहेत.
लोखंडी पाइपाने मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : शहरातील सलामचाचा रस्त्यावर मागील भांडणाची कुरापत काढून तरुणाला लोखंडी पाइपाने गंभीर मारहाण केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इफ्तेखार अहमद नफीस अहमद, रा. अमिनाबाद या तरुणाने फिर्याद दिली आहे. अज्जू व अनस (दोघांचे पूर्ण नाव माहीत नाही) यांनी गंभीर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार बी. व्ही. पाटील हे करीत आहेत.