पारा ३४ अंशावर : नाशिक आता तापू लागलयं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:07 PM2019-02-19T17:07:00+5:302019-02-19T17:09:57+5:30

आठवडाभरापुर्वी शहराचे वातावरण पुर्णत: थंड होते. नाशिककरांना कडाक्याची थंडी जाणवत होती; मात्र या पाच दिवसांपासून वातावरण बदलले असून प्रखर ऊन पडू लागले आहे. यामुळे वातावरणात उष्मा वाढला असून उन्हाची तीव्रताही भासू लागली आहे.

Mercury at 34 degrees: Nashik now gets hot ...! | पारा ३४ अंशावर : नाशिक आता तापू लागलयं...!

पारा ३४ अंशावर : नाशिक आता तापू लागलयं...!

Next
ठळक मुद्देवातावरणात उष्मा वाढला वातावरण बदलले असून प्रखर ऊन पडू लागले

नाशिक : शहराच्या कमाल तापमानात मागील चार ते पाच दिवसांपासून वाढ झाली असून किमान तापमानही वाढले आहे. त्यामुळे वातावरणातील उष्मा वाढला असून नाशिककरांना उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. मंगळवारी (दि.१९) कमाल तापमानाचा पारा ३४ अंशापर्यंत पोहचल्याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली.
आठवडाभरापुर्वी शहराचे वातावरण पुर्णत: थंड होते. नाशिककरांना कडाक्याची थंडी जाणवत होती; मात्र या पाच दिवसांपासून वातावरण बदलले असून प्रखर ऊन पडू लागले आहे. यामुळे वातावरणात उष्मा वाढला असून उन्हाची तीव्रताही भासू लागली आहे. डिसेंबरपासून थंडीने गारठून गेलेल्या नाशिककरांना फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यातील उन्हाची तीव्रताही असह्य वाटत आहे. ‘ऊन वाढले असून आता चटका चांगलाच बसू लागला आहे’ अशी चर्चा ऐकू येत आहे. यामुळे नागरिकांना उष्ण वातावरणाची सवय होता होता पुढील आठवडा तरी लागेल, यात शंका नाही. कारण पुढे मार्च ते मे महिन्यापर्यंत उन्हाची तीव्रता अधिकाधिक वाढलेली असेल. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच उन्हाच्या तीव्रतेचा सामना करण्याची मानसिक तयारी करून ठेवावी लागणार आहे. दरम्यान, सलग तीन महिन्यांपासून थंड वातावरणाची नागरिकांना सवय झाली होती, यामुळे नागरिकांनी उन्हाच्या तीव्रतेला कंटाळून तत्काळ थंड खाद्यपदार्थ, शीतपयेय, बर्फाचे पदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. थंड पदार्थ हे शरीराला हानीकारक ठरू शकतात. कारण हळुहळु वातावरण बदलू लागल्यामुळे शरीराला उष्णतेची सवय होऊ द्यावी, त्यानंतर थंड पदार्थांकडे वळावे, जेणेकरून आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही. अन्यथा सर्दी, खोकला, घशाची खवखव, ताप यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हंगामी विक्रेते रस्त्यांवर
उन्हाची तीव्रता वाढताच शहर व परिसरातील रस्त्यांवर हंगामी विक्रेतेही नजरेस पडू लागले आहे. ऊसाच्या रसाचे गुºहाळ, संत्रा, मोसंबी, अननसचे रसव्रिकी करणारे हातगाडीचालक ठिकठिकाणी दिसू लागले आहे. यासोबतच लिंबू सरबत विक्रेत्यांनीही दुकाने थाटली आहेत. तसेच काही भागात ताक, लस्सी विक्रेत्यांनीही व्यवसाय सुरू केल्याचे चित्र आहे. तसेच यासोबतच स्कार्फ, उन्हाळी टोप्या, सनकोट, सनग्लास आदि वस्तूंचीही विक्री केली जात आहे.

Web Title: Mercury at 34 degrees: Nashik now gets hot ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.