पारा पुन्हा ४० अंशांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:51 AM2019-05-20T00:51:02+5:302019-05-20T00:51:18+5:30

शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा आता नाशिक क रांना असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.

Mercury is again 40 degrees | पारा पुन्हा ४० अंशांकडे

पारा पुन्हा ४० अंशांकडे

Next
ठळक मुद्देतापमानात वाढ : किमान तापमानही विशीच्या पुढे

नाशिक : शहरात पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपर्यंत स्थिरावत होता; मात्र आठवडाभरापासून पुन्हा तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा आता नाशिक क रांना असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारी (दि.१९) ३९.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.
मागील महिन्यात नागरिक ांनी तीव्र उन्हाचा सामना केला. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याने उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले होते. मे महिन्याच्या प्रारंभी ‘फनी’ वादळामुळे वातावरणात काहीस बदल होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. कमाल तापमानात घट होऊन पारा ३४ ते ३५ अंशांच्या जवळपास राहिला. यामुळे उन्हाच्या झळा कमी जाणवत होत्या. मात्र आठवडाभरापासून पुन्हा कमाल तापमानात वाढ झाली आहे. पारा चाळिशीकडे सरकू लागल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे.
शुक्रवारी कमाल तापमान ३७.३ अंश इतके नोंदविले गेले. शनिवारी पारा ३८.९ अंशांपर्यंत पोहचला होता. रविवारी तापमानात वाढ होऊन तापमान ३९ अंशांपुढे सरकले. याबरोबरच किमान तापमानामध्येही वाढ होऊ लागल्याने रात्रीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. किमान तापमान मागील दोन दिवसांपासून विशीच्या पुढे सरकले असून, रविवारी सकाळी २२ अंश इतके नोंदविले गेले. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककरांना पुन्हा चाळिशीपार गेलेल्या तापमानाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत उन्हापासून संरक्षणाच्या उपाययोजनांवर भर देणे गरजेचे असल्याचे शाहरातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
दहा वर्षांचा विक्रम यंदा मोडला
मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम यावर्षी मोडला गेला. मागील महिन्यात २७ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.७ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. १६ एप्रिल २०१० साली ४२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते.
अशी आहेत उष्माघाताची लक्षणे
थकवा जाणवणे, ताप येणे, त्वचा कोरडी होणे, भूक मंदावणे, चक्कर येणे, निरुत्साह वाटणे, डोकेदुखी, पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होणे, घाम येणे अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावा. बर्फाचे पाणी अथवा विविध प्रकारच्या ज्यूसमध्ये बर्फ अतिप्रमाणात टाकून घेणे टाळावे.

Web Title: Mercury is again 40 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.