गोदाकाठचा पारा घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 02:17 PM2020-02-01T14:17:03+5:302020-02-01T14:17:35+5:30
सायखेडा : थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून गोदाकाठ परिसरात सहा अंश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
सायखेडा : थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून गोदाकाठ परिसरात सहा अंश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. परिपक्व द्राक्ष मन्यांना तडे जाण्याच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आठ दिवसांपासून थंडी कमी होऊ लागली होती मात्र दोन दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीने जोर धरला आहे.जे द्राक्ष परिपक्व होत आहे किंवा झाली आहेत , ज्या निर्यातक्षम द्राक्ष बागांना पेपर लावली आहेत, त्यांना तडे जाण्याची शक्यता आह. आणखी काही दिवस अशीच थंडी राहिल्यास तडे जाऊन विक्र ीसाठी योग्य असलेल्या बागा हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गोदाकाठी दोन दिवसांपासून दिवसभर हवेत गारवा असतो. सायंकाळी सहा वाजता घरांची दारे बंद होत आहे तर भल्या पहाटे काही घरासमोर शेकाट्या पेटतांना दिसू लागल्या आहेत. थंडीमुळे दिवसभर नागरिक अंगावर उबदार कपडे घालून शेतात काम करत आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. त्यात गोदाकाठ भागात गोदावरी नदीचे खोरे, मुबलक पाणी असल्याने बागायती शेती, जवळच नांदुरमधमेशवर धरण, बाणगंगा, कादवा नद्यांचा संगम, दारणसांगवी येथे दारणा नदीचा संगम यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर दव पडते. हिरवीगार शेती असल्याने थंडी पडण्यास अनुकूल वातावरण निर्माण होते त्यामुळे दरवर्षी थंडी मोठया प्रमाणावर असते मात्र काही काळ असते. यंदा प्रथमच सलग इतक्या दिवस थंडीचा निच्चांक असल्याने त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि शेती, जनावरे यांच्यावर होत आहे.