पारा पुन्हा घसरला; वाढला थंडीचा कडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 04:28 PM2019-01-08T16:28:23+5:302019-01-08T16:32:46+5:30

नाशिक : थंडीचा कडाका मागील तीन दिवसांपासून पुन्हा वाढला असून किमान तापमानाचा पारा मंगळवारी (दि.८) घसरला. सकाळी साडेआठ वाजता ...

Mercury slips again; Increased cold clog | पारा पुन्हा घसरला; वाढला थंडीचा कडाका

पारा पुन्हा घसरला; वाढला थंडीचा कडाका

Next
ठळक मुद्दे राज्यात सर्वाधिक कमी तापमान अहमदनगरमध्ये ६.४ अंश मंगळवारी किमान तापमान ७.३ अंश

नाशिक : थंडीचा कडाका मागील तीन दिवसांपासून पुन्हा वाढला असून किमान तापमानाचा पारा मंगळवारी (दि.८) घसरला. सकाळी साडेआठ वाजता हवामान केंद्राकडून ७.३ अंश इतके किमान तापमान मोजण्यात आले. त्यामुळे दिवसभरात नाशिककरांना वातावरणात गारठा जाणवत होता.
जम्मू-काश्मीरमध्ये मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर-मध्य महराष्टÑात पुन्हा शीतलहर आली आहे. हवामान खात्याकडून दोन दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा शनिवारी देण्यात आला होता. काश्मीर खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे तेथील तापमानाचा पारा उणे ४ ते उणे ११ अंशांपर्यंत घसरला आहे. बर्फ वृष्टीचा थेट परिणाम पुन्हा उत्तर महाराष्टÑावर होऊ लागला असून, नाशिक गारठण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये ७.६ अंश इतके नोंदविले गेले होते तर मंगळवारी पारा अधिक घसरला. त्यामुळे पहाटेपासून थंडीचा कडाका वाढला होता. यावर्षी नाशिककर थंडीने चांगलेच गारठले आहे. डिसेंबरचा पंधरवडा थंडीने गाजविला. त्या दरम्यान शहराच्या किमान तापमानाचा पारा थेट ५.१ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली होती. थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिकांना आता थंडी कंटाळवाणी वाटू लागली आहे. मंगळवारी कमाल व किमान तापमान घसरल्याने पहाटेपासून थंडी जाणवत होती. दिवसभर प्रखर ऊन जरी शहरात पडले होते तरी थंड वा-याचा वेग वाढल्यामुळे वातावरणात गारठा जाणवत होता. त्यामुळे नागरिक सकाळी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसून आले. मंगळवारी कमाल तापमान २६.६ अंशापर्यंत घसरले. आठवडाभरापुर्वी कमाल तापमानाने तीशी गाठल्याने वातावरणातील गारठा कमी झाला होता. मंगळवारी राज्यात सर्वाधिक कमी तापमान अहमदनगरमध्ये ६.४ अंश इतके नोंदविले गेले.
जानेवारीच्या एक तारखेपासून शहराचे किमान तापमान दहा अंशाच्या खालीच स्थिरावत असल्याने नागरिक गारठले आहे. मकरसंक्रांतीपर्यंत थंडीचा कडाका राहणार असल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकू येऊ लागली आहे. संक्रांतीनंतर थंडीचा जोर कमी होतो अशी सर्वसामान्यांमध्ये धारणा आहे.

Web Title: Mercury slips again; Increased cold clog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.