पारा घसरला; शहर परिसरात थंडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:01 AM2018-11-18T01:01:06+5:302018-11-18T01:01:21+5:30

थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा शनिवारी (दि.१७) १२.२ अंशांपर्यंत घसरल्याने पहाटे थंडी अधिक जाणवली. तसेच संध्याक ाळीदेखील हवेत गारवा निर्माण झाला होता.

The mercury slips; Cold in the city area increased | पारा घसरला; शहर परिसरात थंडी वाढली

पारा घसरला; शहर परिसरात थंडी वाढली

Next
ठळक मुद्देतपमान १२.२ : जाणवू लागली थंडीची तीव्रता

नाशिक : थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा शनिवारी (दि.१७) १२.२ अंशांपर्यंत घसरल्याने पहाटे थंडी अधिक जाणवली. तसेच संध्याक ाळीदेखील हवेत गारवा निर्माण झाला होता.
शहरात थंडीचे आगमन झाले असून, आता तीव्रताही वाढू लागली आहे. शुक्रवारी किमान तपमानाचा पारा अचानकपणे ११.८ अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे थंडी वाढली असून, नाशिककरांकडून आता उबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला जात आहे. सध्या शाळांना दिवाळीच्या सुटी असल्यामुळे सकाळी चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांची लगबग कमी दिसत आहे. मात्र दूधविक्रे ते, वर्तमानपत्र विक्रेत्यांसह ज्यूसविक्रेत्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे संध्याकाळी बाजारपेठांमध्ये लवकर शुकशुकाट दिसू लागला आहे. किमान तपमानाचा पारा जरी घसरत असला तरीदेखील कमाल तपमानाचा पारा अजूनही तिशीपारच असल्यामुळे सूर्यास्तानंतर थंडीचा प्रभाव कमी प्रमाणात जाणवतो.
यावर्षी थंडीचे आगमन उशिराने झाले असून, मंगळवारी (दि.१३) अचानकपणे पारा ११.५ अंशांपर्यंत घसरला होता. त्यानंतर शुक्रवारी ११.८ इतक्या किमान तपमानाची नोंद करण्यात आली. या हंगामात या दोन दिवसांत सर्वाधिक नीचांकी तपमान नोंदविले गेले.

Web Title: The mercury slips; Cold in the city area increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.