मराठा समाज संस्थेतर्फे गुणवंतांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:36 PM2017-10-24T23:36:32+5:302017-10-25T00:14:11+5:30
सध्याचे युग हे स्पर्धेचे असून यात यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले़ जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष प्रकाश (बापू) चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि़८) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात सीमा हिरे बोलत होत्या़
नाशिक : सध्याचे युग हे स्पर्धेचे असून यात यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले़ जिल्हा मराठा समाज उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष प्रकाश (बापू) चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि़८) परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात सीमा हिरे बोलत होत्या़ दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या मराठा समाजातील ३६६ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले़ यावेळी विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन कुटुंबाबरोबरच समाजाचेही नाव उज्ज्वल करावे, असे नाना महाले यांनी सांगितले़ तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली़ तर प्रकाश चव्हाण यांनी समाजाकडून विद्यार्थ्यांना नेहमीच पाठबळ दिले जाईल, अशी घोषणा केली़ व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, डॉ़ सुनील ढिकले, संस्थेचे उपाध्यक्ष हिरामण वाघ, सचिव अरुण पळसकर, सहसचिव अरुण मोरे, कार्याध्यक्ष मधुकर जाधव, गणेश मोरे, सुधाकर चव्हाण, शंकर टाकेकर, डॉ़ राजेंद्र देशमुख उपस्थित होते़ कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी पुंडलिक घुले, सर्जेराव वाघ, शैलेश भुजंगे, शिवराज संधान आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक देवकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ (भाऊ) हिवाळे यांनी तर आभार अविनाश वाळुंजे यांनी मानले़ यावेळी मुलांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़