सुरगाणा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:19 PM2020-09-12T17:19:18+5:302020-09-12T17:20:29+5:30

सुरगाणा : तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांंचा सत्कार पंचायत समिती मध्ये सभापती, उपसभापती व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. मागील वर्षी विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक यांनी तालुक्यात मिशन नवोदय सुरु केले होते. या उपक्र माला मोठे यश मिळाले असुन तालुक्यातील १७ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. यावेळी १७ विद्यार्थ्यांसह, शिष्यवृत्तीचे पहिले सहा विद्यार्थी, एनएम एमएसच्या तीन विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनाही गौरविण्यात आले.

Meritorious students felicitated at Surgana | सुरगाणा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी मनिषा महाले, इंद्रजित गावित, रत्नाकर पगार, संजय कुसाळकर आदी.

googlenewsNext
ठळक मुद्दे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनाही गौरविण्यात आले.

सुरगाणा : तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांंचा सत्कार पंचायत समिती मध्ये सभापती, उपसभापती व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
मागील वर्षी विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक यांनी तालुक्यात मिशन नवोदय सुरु केले होते. या उपक्र माला मोठे यश मिळाले असुन तालुक्यातील १७ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. यावेळी १७ विद्यार्थ्यांसह, शिष्यवृत्तीचे पहिले सहा विद्यार्थी, एनएम एमएसच्या तीन विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनाही गौरविण्यात आले.
पंचायत समितीच्यावतीने झालेल्या कार्यक्र मात सूर्यगड येथील श्रेया गवळी, आर्या भोये, ज्योती बागुल, हर्षाली महाले, यशस्वी चव्हाण, आर्यन वाघमारे, खुशाल पवार, उंबरठाण शाळेतील प्रणाली पवार, हर्षदा गावंडे, विशाल जाधव, आंबाठा शाळेतील मोहन पवार, ज्योती चौधरी,
देवलदरी शाळेतील मोहन राऊत, माणी शाळेतील निखिल गायकवाड, भावना भोये, खुंटविहीर येथील रोहन थोरात, पळसन येथील सिद्धार्थ गवळी यांना गौरविण्यात आले. यासह शिष्यवृत्ती पात्र समीर महाले, जीवन बागुल, श्याम वळवी, योगिता गावित, प्रविण बागुल, दामिनी जाधव या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या देवलदरी शाळेतील विद्यार्थीनी कौशल्या पवार हि राष्ट्रीय पातळीवर खो खो स्पर्धेत खेळत असून जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहे. तिचे मार्गदर्शक क्र ीडा शिक्षक विनायक गावित यांचा सत्कार करण्यात आला.
यासह मार्गदर्शक शिक्षक अजय निटुरे, सतीश इंगळे, भास्कर झरिवाळ, विजय गावित, काळू भोये, विजय नेटके, विठ्ठल पाडवी, राजेंद्र गावित, कैलास बागुल, अविनाश धूम, तानाजी मेटे,सोमनाथ पवार, यांचाही सत्कार करण्यात आला. मिशन नवोदय उपक्र म यशस्वी केल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सभापती मनिषा महाले, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, उपसभापती इंद्रजित गावित, धनंजय कोळी, लता भरसट, दिलीप नाईकवाडे, नरेंद्र कचवे, प्रमिला शेंडगे, नेहा शिरोरे, मंदोदरी पाटील, बाबुराव महाले, शिक्षक एन.एस.चौधरी, रतन चौधरी, सुधाकर भोये, परशराम पाडवी आदी उपस्थित होते.

Web Title: Meritorious students felicitated at Surgana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.