एमईएस बिल्डर्स संघटनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:15 AM2017-08-01T00:15:41+5:302017-08-01T00:16:00+5:30
एमईएस (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस) मार्फत लष्करी विभागात ठेकेदारी पद्धतीने कामे करणाºया एमईएस बिल्डर्स असोसिएशनने निदर्शने करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंजूर कामे करण्यासही विलंब होत असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.
देवळाली कॅम्प : एमईएस (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस) मार्फत लष्करी विभागात ठेकेदारी पद्धतीने कामे करणाºया एमईएस बिल्डर्स असोसिएशनने निदर्शने करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंजूर कामे करण्यासही विलंब होत असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. असोसिएशनचे दक्षिण सदर्न कमांडोचे केंद्रीय उपाध्यक्ष दीपक बलकवडे यांनी सांगितले की, एमईएसच्या माध्यमातून १०० हून अधिक ठेकेदार स्कूल आॅफ आर्टिलरी व आर्टिलरी सेंटरमध्ये लष्करी आस्थापना निवास आदी ठिकाणी बांधकाम, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, दुरुस्तीची कामे करण्यात येत असतात. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर कामगार लागतात. पूर्वी ही कामे एमईएसच्या पातळीवर होत असत. आता मात्र सुरक्षाव्यवस्था कडक करून स्टेशन मुख्यालयाकडून ठेकेदारांना व कामगारांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. याप्रश्नी बोर्डाने लक्ष न दिल्याने काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात दक्षिण सदर्न कमांडोचे केंद्रीय उपाध्यक्ष दीपक बलकवडे, योगेश चांदवडकर, अनिल बालाणी, चेतन देव, जी. डी. बजाज, प्रमोद अहिरे, समीर पटणी, मिलिंद उपासनी, सोनू सचदेव, राहुल चौधरी, विनोद सिंग, संजय पोरजे, मंगेश निसाळ, संजय बलकवडे आदी ठेकेदारांनी सहभाग घेतला.
प्रत्येक ठेकेदाराकडे सुपरवायझरसह अनेक कामगार असतात व ठेकेदारांना तीन, सहा व वर्षभरासाठीही असतात. स्टेशन मुख्यालयाने आता लष्करी विभागात प्रवेशपत्र देण्याचे धोरण अतिशय कडक केले आहे. त्यास असोसिएशनचा विरोध नाही. मात्र कामगारांना विभागात कामावर जाण्यासाठी प्रवेशपत्र त्वरित मिळत नाही. प्रत्येक कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणणे व लष्करी प्रवेशपत्र घेणे यातच अधिक वेळ जातो. परिणामी कामे निर्धारित वेळेत होत नाही. त्यामुळे विलंब नोटीस दिली जाते.