मेशीत जगदंबामाता यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:13 AM2018-04-11T00:13:12+5:302018-04-11T00:13:12+5:30
मेशी : देवळा तालुक्यातील मेशी या गावाला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील आराध्य दैवत जगदंबामातेचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे.
मेशी : देवळा तालुक्यातील मेशी या गावाला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील आराध्य दैवत जगदंबामातेचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे. यानिमित्ताने विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्र म आयोजित करण्यात आले आहे. आठ दिवस बोहाडा उत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी संध्याकाळी मानाच्या काठीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. आठ दिवस रामायणावर आधारित बोहाडा आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने गेल्या आठ दिवसांपासून मंदिराची साफसफाई करण्यात आली. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गावात मध्यवर्ती ठिकाणी देवीचे प्रशस्त मंदिर आहे. मंदिर परिसरात सजावट केली आहे.
अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी देवीच्या पालखी मिरवणुकीनंतर बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.