जन्मभुमीत परतलेल्या जवानांचा मेशी मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:09 PM2021-02-06T16:09:35+5:302021-02-06T16:37:29+5:30

मेशी : एकोणीस वर्षाची भारतीय लष्करी सेनेच्या माध्यमातुन देशसेवा करून मेशी येथील भूमिपुत्र कमलेश जोंधळे व मिलिंद आहेर हे जवान सेवानिवृत्त झाल्यामुळे मेशी येथे त्यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत करण्यात केले. या जवानांची गावातून भव्य सजविलेल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.

Meshi procession of soldiers returning to their homeland | जन्मभुमीत परतलेल्या जवानांचा मेशी मिरवणूक

सेवानिवृत्त लष्करी जवानांची गावातून वाजतगाजत मिरवणूक.

googlenewsNext
ठळक मुद्देगावात आनंदोत्सव : सडारांगोळ्या काढून जोरदार स्वागत

मेशी : एकोणीस वर्षाची भारतीय लष्करी सेनेच्या माध्यमातुन देशसेवा करून मेशी येथील भूमिपुत्र कमलेश जोंधळे व मिलिंद आहेर हे जवान सेवानिवृत्त झाल्यामुळे मेशी येथे त्यांचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत करण्यात केले. या जवानांची गावातून भव्य सजविलेल्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.

हे जवान १०९ इंजिनिअर बटालियनमध्ये कार्यरत होते. सेवा निवृत्ती नंतर ते आपल्या जन्मभुमीत परतले. यावेळी गावात ठिक ठिकाणी सुवासिनींनी या दोघा जवानांचे औक्षण केले. मिरवणूकीत दोन्ही जवानांच्या पत्नीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी मेशीचे माजी सरपंच केदा शिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावकऱ्यांनी भारतमातेचा जयघोष करत आनंद साजरा केला. कार्यक्रमाला मेशीचे लोकनियुक्त सरपंच सुनंदा अहिरे, उपसरपंच भिका बोरसे, बापू जाधव, शाहू शिरसाठ, सतीश बोरसे आदींसह ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच गावातील आयपीस अधिकारी केतन कदम हे देखील यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलाही या कार्यकमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Meshi procession of soldiers returning to their homeland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.