सहायक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:17 AM2021-09-23T04:17:31+5:302021-09-23T04:17:31+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त विभाग-४ यांच्या कार्यालयात तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कार्यालयात देवळाली पोलीस ठाण्यातील ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त विभाग-४ यांच्या कार्यालयात तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कार्यालयात देवळाली पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात अक्षय प्रकाश साळवे व इतर प्रकरणात सुनावणी सुरू असताना संशयित आरोपी शफीउद्दीन कमरुद्दीन काझी (वय ५२), रफीक शफीऊद्दीन काझी (३०), रिझवान शफीउद्दीन काझी(२५), सर्व रा. मगरचाळ, जेलरोड यांनी परवानगीशिवाय न्यायदान कक्षात प्रवेश करून सुनावणीमध्ये अडथळा आणत गोंधळ घालून घोषाबाजी केली. यावेळी पोलीस हवालदार प्रकाश तुकाराम तुंगार यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत बाहेर जाण्यास सांगितले. तसेच त्यांना बाहेर काढत असताना आरोपींनी आरडाओरड करीत शिवीगाळ व घोषणाबाजी करून प्रकाश तुंगार यांची कॉलर पकडून झटापट केली व त्यांना ढकलून दिले. त्यामुळे प्रकाश तुंगार यांनी तीनही आरोपींविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांनाही संशयितांना अटक केली आहे.