‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’द्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:50 AM2017-09-17T00:50:32+5:302017-09-17T00:50:43+5:30
माणसाने आपल्या जीवनशैलीत बदल करीत क्लोरोफ्लोरो कार्बनचा वापर अधिकाधिक कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. वातानुकूलित यंत्रांचा मोह आवरून पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणारा ओझोनसाठी विषारी ठरणारे वायू रोखण्यासाठी योगदान द्यावे, या उद्देशाने ‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’ हा प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आला.
नाशिक : माणसाने आपल्या जीवनशैलीत बदल करीत क्लोरोफ्लोरो कार्बनचा वापर अधिकाधिक कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. वातानुकूलित यंत्रांचा मोह आवरून पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणारा ओझोनसाठी विषारी ठरणारे वायू रोखण्यासाठी योगदान द्यावे, या उद्देशाने ‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’ हा प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आला.
ओझोन डे निमित्ताने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली गोल्फ क्लब मैदानावर शनिवारी (दि.१६) ओझोन वॉकचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक पोलीस आयुक्तालय वुमन सोसायटी फॉर इन्वायर्मेंट कल्चर अॅण्ड एज्युकेशन व रोटरी क्लब आॅफ नाशिक यांनी संयुक्तरीत्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, नितीन महाजन, रतन लथ, शालिनी कडवे, डॉ. राज नगरकर, प्रदीप शेनॉय, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल, रुजुता मुळे आदींसह नाशिकमधील औद्योगिक, सामाजिक, पर्यावरणप्रेमी, शैक्षणिक युवक व्यावसायिक, सरकारी व निमसरकारी संस्थांसह बांधकाम व्यावसायिक व अन्य संस्थांनीही या ओझोन वॉकमध्ये पांढºया रंगाचे कपडे परिधान करून सहभाग नोंदवला. नाशिकला पर्यावरण राजधानी करण्याच्या दृष्टीने नाशिककरांनी ओझोन वॉकमध्ये घेतलेला सहभाग महत्त्वाचा असल्याचे ुूसिंगल म्हणाले. वॉक नंतर ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते उपक्रमातील सहयोगकर्त्यांना गौरविण्यात आले. समन्वयक धनश्री हरदास यांनी प्रास्ताविक केले.