सिडको भागात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:56 AM2018-09-25T00:56:03+5:302018-09-25T00:56:48+5:30

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सिडको व अंबड भागातील घरघुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

 Message to Ganaraya in a warm atmosphere in the CIDCO area | सिडको भागात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

सिडको भागात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

Next

सिडको : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सिडको व अंबड भागातील घरघुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मूर्ती दान उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. सिडको प्रभागातून १३ हजार १४४ मूर्तींचे संकलन करण्यात आले असून, सुमारे सात टन निर्माल्य जमा झाले असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.  प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी दान करण्यासाठी सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. यात गोविंदनगर येथील जिजाऊ वाचनालय (८१३), इंदिरानगर येथील डे के अर शाळा (६२०), अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुल (६३०२), पिंपळगाव खांब वालदेवी नदी (१२००), पवननगर जलकुंभ कमाटवाडे येथील मॉसाहेब मीनाताई ठाकरे शाळा (८८८) आदींसह सहा ठिकाणी मनपाच्या वतीने मूर्ती संकलनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर, नगरसेवक अलका अहिरे, छाया देवांग, किरण गामणे, बाळासाहेब पाटील, डॉ. दिलीप श्ािंदे, यशवंत नेरकर, उखा चौधरी आदींनी मूर्ती संकलनासाठी आवाहन केले. सिडको प्रभागात एकूण १३ हजार १४४ मूर्ती संकलन व सात टन निर्माल्य जमा करण्यात आले. यासाठी सहा वाहने, १२ ट्रॅक्टर, तीन डंपरची व्यवस्था करण्यात आली होती.
‘नाशिकची आई गोदामाई’तर्फे जनजागृती
नाशिकची आई गोदामाई या संस्थेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी जनजागृती करण्यात आली होती. गणेश विसर्जनाच्या दिवशी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांना मूर्ती दान करण्याचे आवाहन केले होते. यात सुमारे पाच हजार मूर्तींचे संकलन करून ते मनपाकडे सुपूर्द करण्यात आले. या मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष सचिन महाजन, दर्शन शिरोडे व पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title:  Message to Ganaraya in a warm atmosphere in the CIDCO area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.