पतंगातून दिला मांजा मुक्तीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 09:32 PM2020-01-14T21:32:26+5:302020-01-15T00:12:05+5:30
मकरसंक्र ांतीनिमित्त पतंगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनी सज्ज झाली आहे. निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर येथे पतंग निर्मितीची कार्यशाळा आयोजित करून पतंगावर बेटी बचाओ-बेटी पढाओ, नायलॉन मांजा मुक्ती हे वाक्य लिहून मुलींच्या सन्मानाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
निफाड : मकरसंक्र ांतीनिमित्त पतंगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनी सज्ज झाली आहे. निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर येथे पतंग निर्मितीची कार्यशाळा आयोजित करून पतंगावर बेटी बचाओ-बेटी पढाओ, नायलॉन मांजा मुक्ती हे वाक्य लिहून मुलींच्या सन्मानाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
मकरसंक्र ांतीचा सण पर्यावरण पूरक पद्धतीने कसा साजरा करायचा याची माहिती देत पतंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले. कला, कार्यांनुभव अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वत: पतंग तयार करून तो आपल्या कल्पकतेने सजवला. गोरख सानप यांनी प्रत्येक पतंगावर लेक वाचवा-लेक शिकवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, मुलगा मुलगी एकसमान, सुखी संसाराचे सुत्र कन्येलाच माना पुत्र, आज मुलींचा जीव घोटून उद्या सून आणाल कोठून?, मुलगा शान आहे तर मुलगी सन्मान आहे, माझी मुलगी माझा अभिमान,नायलॉन मांजा वापरु नका असा संदेश देण्यात आला. किरण खैरनार यांनी नायलॉन मांजा वापरल्याने होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले.
भारतीय सण उत्सवातून बेटी बचाओ-बेटी पढाओ व मांजामुक्तीचा संदेश देत जनजागृती करणाऱ्या या उपक्र माचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, विश्वस्त अॅड. ल. जि. उगावकर, वि. दा. व्यवहारे, सचिव रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी, किरण कापसे, राजेश सोनी, अॅड. दिलीप वाघवकर, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, केंद्रप्रमुख विश्वास सानप, मुख्याध्यापिका एस. पी. तनपुरे व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कायशाळेसाठी गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव यांनी परिश्रम घेतले.