ओटीभरण कार्यक्र मातून वृक्ष संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:31 AM2019-07-07T00:31:05+5:302019-07-07T00:33:39+5:30
येवला : एकात्मिक बाल विकास प्रकल्प २ अंतर्गत तालुक्यातील धुळगाव येथील भीमनगरमधील अंगणवाडी क्रमांक चारमध्ये गरोदर मातांचा ओटीभरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी अंगणवाडी मदतनीस रिना विनेश गायकवाड व आशा कार्यकर्ते वालूबाई जगताप यांनी महिलांना रोपटे वाटप करून लहान बाळासारखेच या झाडांचे संवर्धन व संगोपन करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.
येवला : एकात्मिक बाल विकास प्रकल्प २ अंतर्गत तालुक्यातील धुळगाव येथील भीमनगरमधील अंगणवाडी क्रमांक चारमध्ये गरोदर मातांचा ओटीभरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी अंगणवाडी मदतनीस रिना विनेश गायकवाड व आशा कार्यकर्ते वालूबाई जगताप यांनी महिलांना रोपटे वाटप करून लहान बाळासारखेच या झाडांचे संवर्धन व संगोपन करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.
यावेळी गरोदर मातेची ओटी भरताना उपस्थित स्थानिक बचतगटांच्या महिला व गरोदर मातेला यावेळी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून ओटीभरण कार्यक्रमास सुरुवात झाली. गर्भवती मातेचे ओटीभरण करणे ही प्राचीन रूढी, परंपरा आजही समाजजीवनात टिकून आहे. ही भारतीय लोकसंस्कृतीतील महिलांच्या जीवनातील प्रमुख रूढी परंपरा आहे. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवचैतन्य बहरून नवनवीन नवनिर्मितीचे सामर्थ्य आहे, त्याचप्रमाणे स्रियांच्या उदरात वंशवृद्धीचे सामर्थ्य आहे.
ओटी भरून गरोदर मातेला केलेले अभीष्टचिंतन म्हणजेच ओटीभरण असते,
असे आशा स्वयंसेविका कार्यकर्ती वालूबाई जगताप त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.
शासनाच्या वतीने वृक्ष महोत्सव सप्ताह साजरा करीत असताना येथील भीमनगर- मध्येही झाडे लावा-झाडे जगवा हा संदेश आपल्या कृतीतून दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी रिना गायकवाड यांनी सांगितले. यावेळी वालूबाई जगताप, उज्ज्वला गायकवाड, सोनाली गायकवाड, सुनीता गायकवाड, सपना गायकवाड, वैशाली पैठणकर, माळसा पळसकर, रेणुका गायकवाड, सिंधूबाई गांगुर्डे, कल्पना गायकवाड, सारिका गायकवाड, जनाबाई पगारे, कांताबाई गायकवाड, शीतल गायकवाड, लंका गायकवाड, पल्लवी मांजरे, नंदा सोनवणे आदी महिला उपस्थित होत्या. गर्भवती मातेचे ओटीभरण करणे ही प्राचीन रूढी परंपरा आजही समाजजीवनात टिकून आहे. ही भारतीय लोकसंस्कृतीतील महिलांच्या जीवनातील प्रमुख रूढी परंपरा आहे. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवचैतन्य बहरून नवनवीन नवनिर्मितीचे सामर्थ्य आहे त्याचप्रमाणे स्रियांच्या उदरात वंशवृद्धीचे सामर्थ्य आहे.
शासनाच्या वतीने वृक्षमहोत्सव सप्ताह साजरा करीत असताना येथील भीमनगरमध्येही झाडे लावा- झाडे जगवा हा संदेश आपल्या कृतीतून दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी रिना गायकवाड यांनी सांगितले.