इदगाहवरून देशप्रेमाचा संदेश

By admin | Published: June 27, 2017 12:57 AM2017-06-27T00:57:41+5:302017-06-27T00:57:54+5:30

नाशिक : आपल्या देशावरील प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे आणि भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असा संदेश शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी इदगाह मैदानावरून देण्यात आला.

Message of patriotism from Idgah | इदगाहवरून देशप्रेमाचा संदेश

इदगाहवरून देशप्रेमाचा संदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आपल्या देशावरील प्रेम अधिकाधिक वृद्धिंगत व्हावे आणि भारताच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, असा संदेश शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी इदगाह मैदानावरून देण्यात आला. हजारो समाजबांधव यावेळी रमजान ईदच्या नमाजपठणासाठी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने उपस्थितांनी सामूहिक विशेष नमाज अदा केली.  रमजान ईदनिमित्त (ईद-उल-फित्र) शहरातील इदगाह मैदानावर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली शहर व परिसरातील हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधवांनी नमाजपठण केले. सकाळी ढगाळ हवामानासह रिमझिम पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये काही वेळ चिंतेचे वातावरण होते; मात्र क्षणार्धातच ढगाळ हवामान दूर होऊन सूर्यप्रकाश पडल्याने इदगाहच्या मुख्य नमाजपठणाच्या सोहळ्याबाबत असलेली चिंता दूर झाली. सकाळी साडेआठ वाजेपासूनच नागरिक मैदानाच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली होती.
... जब दिल से दिल मिलता हैं
‘जब ईद आती हैं, तो हर दिल से दिल मिलता हैं...,’ याची प्रचिती इदगाह मैदानावर उपस्थितांनी अनुभवली. उपस्थित हजारो मुस्लीम बांधव एकमेकांशी हस्तांदोलन करत आलिंगन देऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत होते. आपापसातील बंधूभाव अधिकाधिक वृद्धिंगत व्हावा, सामाजिक सलोखा राखला जावा, हाच उद्देश यावेळी दिसून आला.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात ईदच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. ईदगाह मैदान येथे विविध मान्यवर आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत आलिंगन दिले.
मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
ईदनिमित्त इदगाह मैदानावर महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, दिनकर पाटील, हेमलता पाटील, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, विनायक खैरे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त विजय मगर, माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, अजय देवरे आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन खतीब यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Message of patriotism from Idgah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.